Join us  

धक्कादायक..! अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वडिलांवर चोरट्याचा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 12:28 PM

Sonalee Kulkarni: अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या पुण्यातील घरात एका व्यक्तीने घुसून तिच्या वडिलांवर हल्ला केल्याचे धक्कादायक वृत्त नुकतेच समोर आले आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी काही दिवसांपूर्वी दुबईत कुणाल बेनोडेकरसोबत लग्न केले. ही माहिती तिने आपल्या चाहत्यांना सोशल मीडियावर दिली. मात्र आता दुसरीकडे आता एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. सोनाली कुलकर्णीच्या पुण्यातील घरी २४ मे रोजी चोरट्याने तिच्या वडिलांवर हल्ला केल्याचे समोर आले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या पुण्यातील निगडी येथील घरी चोरीचा प्रयत्न झाला. यावेळी चोरट्याने सोनालीच्या वडिलांवर चाकूने हल्ला केला. सुदैवाने यात ते किरकोळ जखमी झाले आहेत. अजय विष्णू शेट्टे (वय २४, रा. बिड) , असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.  मात्र, एकूणच या संपूर्ण प्रकरणामुळे सोनालीच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. सोनालीचे वडील मनोहर कुलकर्णी यांच्यावर उपचार करण्यात आले. तसेच याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

नकली पिस्तूल जप्त

संशयित आरोपीला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याच्याकडून चाकू, दोरी, तसेच खेळण्यातील प्लास्टिकचे नकली पिस्तूल जप्त केले. आरोपी हा घरात घुसून जबरी चोरी करण्याच्या प्रयत्नात होता, मात्र त्याला पकडण्यात आले.

टॅग्स :सोनाली कुलकर्णीगुन्हेगारी