मराठी कलाविश्वातील मानाचा मानला जाणारा झी मराठी पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. यंदा या पुरस्कार सोहळ्याला मराठी कलाकारांसह बॉलिवूड तारे-तारकांनीदेखील हजेरी लावली होती. विशेष म्हणजे यावेळी माधुरी दीक्षित (madhuri dixit) आणि मलायका अरोरा (malaika arora) यांनी या पुरस्कार सोहळ्याची रंगत वाढवली. इतकंच नाही तर मलायकाने चक्क प्रेक्षकांशी मराठीत संवाद साधला. यावेळी एका छोट्याशा टास्क दरम्यान श्रेया बुगडेने (shreya bugade) अर्जुन या नावाचा उल्लेख केला. विशेष म्हणजे अर्जुनचं नाव ऐकताच मलायकानेही त्यावर भन्नाट उत्तर दिलं.
नुकत्याच पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्यामध्ये मलायकाने चक्क बेसनाचे लाडू करुन दाखवले. हे लाडू करत असताना श्रेयाने अप्पी आमची कलेक्टर या मालिकेतील अर्जुन आणि सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेतील अद्वैत राजाध्यक्ष यांना मंचावर बोलावलं. यावेळी श्रेया या कलाकारांना बोलवत असताना तिने 'अर्जुन कुठेय' असं विचारलं. यावेळी अर्जुन हे नाव ऐकताच मलायकाला अभिनेता अर्जुन कपूरची आठवण आली. ज्यामुळे 'अर्जुन...तो घरी आहे', असं भन्नाट उत्तर तिने दिलं.
दरम्यान, मलायकाने हे उत्तर देत पुन्हा एकदा त्यांचं प्रेम जाहीरपणे व्यक्त केलं. इतकंच नाही तर तिचं हे उत्तर ऐकल्यावर उपस्थित सगळेच आश्चर्यचकित झाले. सध्या मलायकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.