पहिला मराठमोळा रॅपर बनला श्रेयस जाधव
By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2017 4:39 PM
सध्याची तरूणाई रॅप साँगच्या प्रेमात पडलेली पाहायला मिळत आहे. बॉलिवुड चित्रपटामधील रॅप सॉग हे तरूणांमध्ये हिट होत असतात. मात्र ...
सध्याची तरूणाई रॅप साँगच्या प्रेमात पडलेली पाहायला मिळत आहे. बॉलिवुड चित्रपटामधील रॅप सॉग हे तरूणांमध्ये हिट होत असतात. मात्र त्यातुलनेत मराठी रॅप साँग कधी ऐकले आहे का? तसेच मराठी चित्रपट मोठया प्रमाणात येत असूनदेखील रॅप साँग हा ट्रेड मराठी चित्रपटसृष्टीत तसा पाहायला मिळत नाही. मात्र आता प्रेक्षकांना लवकरच मराठी रॅप साँग ऐकण्यास मिळणार आहे. यापूर्वी मराठीच्या काही पॉप गाण्यांमध्ये रॅपचा वापर केला असला तरी, प्रथमच एक संपूर्ण गाणे रॅप'मध्ये सादर होणार आहे. आजच्या इंग्रजाळलेल्या मराठी तरुणाईला भुरळ घालणा-या 'रॅपसॉंग' चे मराठीकरण करण्याचे काम निमार्ता आणि गायक श्रेयस जाधव याने केले आहे. संपूर्ण रॅप असलेलं 'पुणे रॅप' हे गाणे प्रेक्षकांना लवकरच ऐकण्यास मिळणार आहे. या गाण्याचे प्रत्येक बोल तरुणाईला भुरळ पाडणारे आहेत. हे गाणं पुण्याबद्दल असून ह्यात पुणेरी वैशिष्ट्यांचा उल्लेख तर आहेच पण त्यासोबतच प्रसिध्द शनिवारवाड्याचे भव्य दिव्य रूपही यात पाहायला मिळणार आहे. हार्डकोअर पुणेकर असणाºया या गाण्याचे बोल वैभव जोशी यांनी लिहिले आहे, तसेच हृषीकेश, सौरभ आणि जसराज यांचे संगीत लाभले आहे. एव्हरेस्ट इंटरटेनमेन्ट आणि गणराज प्रॉडक्शनच्या बॅनर खाली प्रसिद्ध होणारे हे पुणेरी रॅप मराठी संगीतक्षेत्राला महत्वाचे वळण देणारे ठरणार आहे. तसेच अजून काही रॅप गाणीदेखील या वर्षात काढणार असल्यामुळे हे नवीन वर्ष श्रेयससाठी दुहेरी धमाका ठरणार आहे. यापूर्वी 'आॅनलाईन बिनलाईन' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तसेच या चित्रपटातील 'ओ हो काय झालं या हरिहरन आणि लेसली लुईस यांच्या गाण्यामध्ये श्रेयसने दिलेला रॅपिंगचा तडका आजही लोकांच्या स्मरणात आहे. त्याच्या या रॅपला लोकांनी दादही दिली होती.