अभिनय क्षेत्रात उत्तम कामगिरी करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा कलाकार म्हणजे श्रेयस तळपदे. श्रेयसला मोठ्या पडद्यावर पाहिलं की त्याची मेहनत आणि कामाप्रती त्याचं असणारं प्रेम दिसून येतं. श्रेयस त्याच्या कामामध्ये कितीही व्यस्त असला तरी आपल्या कुटुंबामध्येही तो तितकाच रमलेला दिसतो. श्रेयस त्याच्या कुटुंबासोबत बऱ्याचदा एकत्रित वेळ घालवताना दिसतो. त्याचे त्याच्या कुटुंबासोबतचे अनेक फोटो देखील सोशल मीडियावर आपण पाहतो. शातच श्रेयसच्या पत्नीने शेअर केलेल्या एका फोटोने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतले.
श्रेयसच्या लेकीचं नाव आहे आद्या. श्रेयसची पत्नी दीप्तीने शेअर केलेल्या फोटोवरून श्रेयस आणि त्याची लेक आद्या यांच्यातील खास बॉण्डिंग पाहायला मिळतंय. आद्याने श्रेयसच्या केसांना तिचे क्लिप्स लावलेले दिसून येत आहेत. हे हेअर क्लिप्स पाहून श्रेयस आद्याबरोबर वेळ घालवताना दिसतोय. श्रेयसचा हा क्यूट फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. याआधी श्रेयस त्याच्या लाडक्या लेकीसोबत रंगपंचमीचं खास सेलिब्रेशन करताना दिसून आला.