Join us

रूपेरी पडद्यावर पाहायला मिळणार श्रेयस तळपदेची विठ्ठल भक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 9:00 PM

राजीव एस रुईया यांची कथा आणि दिग्दर्शन सोबत  टेक्सास स्टुडियोजचे प्रकाश सिंघी यांची प्रस्तुती असलेल्या या सिनेमात सचित  पाटील, अशोक समर्थ, दीप्ती धोत्रे, भाग्यश्री मोटे आणि हर्षदा विजय हा नवीन चेहरा आपल्याला बघायला मिळणार आहे.

मराठी छोट्या आणि मोठ्या पडद्यावरील मालिका तसेच चित्रपटांमधून विठ्ठलावर आधारित अनेक कथानक सादर झाली आहेत. 'सावळ्या विठ्ठला'वर आधारीत असलेल्या या सर्व कलाकृती प्रेक्षकांनादेखील आवडत आहेत. अशा या अखंड विठ्ठलवेड्या महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी लवकरच एक नवाकोरा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 'विठ्ठल' असे या सिनेमाचे नाव असून, दशरथ सिंग राठोर आणि उमेद सिंग राज पुरोहित यांची निर्मिती असलेला हा सिनेमा १४ डिसेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्राला हरिनामाच्या गजरात तल्लीन करण्यास येत आहे.

नुकतेच ह्या चित्रपतील विठ्ठला विठ्ठला हे गाणे रिलीज झाले आहे.भरपूर दिवसांनी मराठी मध्ये दिसणारा श्रेयस तळपदे हा  २५ फूट अशा भव्य विठ्ठलाच्या मूर्ती समोर वंदन करताना दिसत आहे. २५० डान्सर सोबत ढोल ताशा पथक, अबीराची उधळण, भगव्या पताका, गाण्याच्या शेवटी सचित पाटीलच्या रूपात होणारे विठ्ठल दर्शन आणि विशाल दादलानीचा दमदार आवाज  यासर्वातूनच या  गाण्याची  भव्यता बघायला मिळत आहे. सदर गाणे गुरु ठाकूर यांनी लिहिले असून राजू सरदार यांनी गाण्याला संगीतबद्ध केले आहे.            

राजीव एस रुईया यांची कथा आणि दिग्दर्शन सोबत  टेक्सास स्टुडियोजचे प्रकाश सिंघी यांची प्रस्तुती असलेल्या या सिनेमात सचित  पाटील, अशोक समर्थ, दीप्ती धोत्रे, भाग्यश्री मोटे आणि हर्षदा विजय हा नवीन चेहरा आपल्याला बघायला मिळणार आहे.   'विठ्ठल' नामाचा गजर करणाऱ्या या सिनेमाच्या निर्मीतीची धुरा दशरथ सिंह राठोड आणि उमेद सिंह राज पुरोहित यांनी सांभाळली असून, जगदीश जाखड, प्रह्लाद सिंह राजपुरोहित आणि अरुण त्यागी हे सहनिर्मात्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. तसेच 'विठ्ठल' या सिनेमाची पटकथा रवींद्र पाटील यांची असून, संदीप दंडवते यांनी संवादलेखन केले आहे. हा चित्रपट ७ डिसेंबर ला जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

टॅग्स :श्रेयस तळपदे