Join us

आई रॉक्स आणि श्रुती शॉक्ड...! पावसानं श्रुती मराठेच्या घराची काय अवस्था केली बघा तरी...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2021 11:40 AM

Shruti Marathe : श्रुतीने सोशल मीडियावर याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओत श्रुतीच्या घराची अवस्था दिसतेय.

ठळक मुद्देश्रुती मराठेने तमिळ सिनेमा ‘इंदिरा विजहा’मधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. खरेतर श्रुती मराठेने तमीळ चित्रपटसृष्टीत हेमा मालिनी या नावाने पदार्पण केले. त्यानंतर तिने नाव बदलून श्रुती प्रकाश केले.

धो-धो बरसणारा पाऊस सामान्यांचे हाल करतो. पण सेलिब्रिटींही हीच अवस्था असेल तर नवल वाटल्याशिवाय राहत नाही. आता मराठमोळी अभिनेत्री श्रुती मराठे (Shruti Marathe ) हिचेच बघा. पावसाने तिच्या घराची चांगलीच वाईट अवस्था केली. श्रुतीने सोशल मीडियावर याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओत श्रुतीच्या घराची अवस्था दिसतेय. ‘तुमच्याकडे पण असे होते का, की फक्त माझ्याकडेच असे होते?,’ अशी कॅप्शन देत तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत श्रुतीची रूम दिसतेय आणि अख्ख्या रूममध्ये कपडे वाळत घातलेले दिसताहेत. अगदी बेडवरही कपडे वाळत पडलेले दिसत आहेत.

या व्हिडिओमध्ये श्रुती म्हणते, ‘आज दिवसभर काम होतं मला. मी आताच घरी आले. पुण्यात आज पाऊस पडला तर माझ्या रुमची काय हालत झाली आहे प्लीज बघा. आई मी कुठे झोपायचं. सांग ना, इथे झोपू की इथे झोपू...?’ यानंतर तिचा रडवेला आवाज ऐकायला येतो.

 श्रुतीने शेअर केलेल्या या व्हिडीओवर चाहत्यांच्या भरभरून कमेंट्स येत आहेत. ‘पाऊस आला की, बेडरूममध्ये कपडे वाळत टाकणं हे एक शास्त्र असतं,’ अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. ‘ये मौसम का जादू है मितवा,’  ‘सगळीकडे अशीच अवस्था आहे,’अशा आशयाच्या कमेंट काही चाहत्यांनी केल्या आहेत. तर एकाने ‘आई रॉक्स आणि श्रुती शॉक्ड’, अशी काही मजेशीर कमेंट देखील केल्या आहेत.९ आॅक्टोबर १९८६ रोजी बडोदा येथे श्रुतीचा जन्म झाला. त्यानंतर श्रुती आणि तिचे कुटुंब पुण्यात स्थायिक झाले. पुण्यातील सेंट मीरा शाळेतून तिने शिक्षण पूर्ण केले. शालेय जीवनातच तिला अभिनय आणि डान्सची आवड निर्माण झाली.

दहावी पास झाल्यानंतर श्रुतीला पहिली अभिनयाची संधी मिळाली. स्मिता तळवळकर दिग्दर्शित ‘पेशवाई’ या मालिकेत तिला अभिनय करण्याची संधी मिळाली. महाविद्यालयीन जीवनात अनेक नाटकात श्रुतीने काम केले. तसेच अनेक जाहिरातीत काम केले. त्यानंतर तिने अभिनय क्षेत्रात करिअर करायचे ठरविले आणि मुंबईत दाखल झाली.  श्रुती मराठेने तमिळ सिनेमा ‘इंदिरा विजहा’मधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. खरेतर श्रुती मराठेने तमीळ चित्रपटसृष्टीत हेमा मालिनी या नावाने पदार्पण केले. त्यानंतर तिने नाव बदलून श्रुती प्रकाश केले. त्यानंतर दाक्षिणात्य इंडस्ट्रीत ती श्रुती प्रकाश या नावाने ओळखली जाते. तिने बºयाच तमीळ चित्रपटात काम केले आहे. 

टॅग्स :श्रुती मराठे