Join us

श्रृती मराठेची पहिली आंतरराष्ट्रीय सहल का ठरली संस्मरणीय?, सोशल मीडियावर श्रृतीच्या या पिकनिकचीच चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 5:43 PM

सर्वसामान्यांप्रमाणे सेलिब्रिटीसुद्धा त्यांच्या शुटिंगच्या निमित्ताने किंवा कार्यक्रमांच्या निमित्ताने फिरत असतात. त्यातच आज जागतिक पर्यटन दिन असल्याने विविध सेलिब्रिटी सोशल मीडियावर त्यांचे पर्यटनस्थळांवरील फोटो शेअर करत आहेत.

भटकंती कुणाला नाही आवडत... आपल्यापैकी प्रत्येकालाच फिरायला आवडतं. आपल्या आजूबाजूच्याच नाही तर देश आणि जगातील विविध पर्यटनस्थळांना भेट द्यायला प्रत्येकालाच आवडतं. या पर्यटनस्थळी निवांत क्षण घालवणं प्रत्येकालाच भावतं. विविध पर्यटनस्थळांची सफारी आपल्यापैकी प्रत्येकालाच आवडते. सर्वसामान्यांप्रमाणे सेलिब्रिटीसुद्धा त्यांच्या शुटिंगच्या निमित्ताने किंवा कार्यक्रमांच्या निमित्ताने फिरत असतात. त्यातच आज जागतिक पर्यटन दिन असल्याने विविध सेलिब्रिटी सोशल मीडियावर त्यांचे पर्यटनस्थळांवरील फोटो शेअर करत आहेत.

जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने अभिनेत्री श्रृती मराठे हिची पहिली आंतरराष्ट्रीय सहलीची आठवण सध्या सोशल मीडियावर तिच्या फॅन्ससाठी चर्चेचा विषय ठरली आहे. श्रृतीसाठी तिची पहिली आंतरराष्ट्रीय सहल एक सरप्राईज होती. नववी पास झाल्यानंतर मे महिन्याच्या सुट्टीत श्रृती आणि तिचे कुटुंबीय फिरायला जाणार होते. श्रृतीने कुठे जातो आहे असं विचारल्यावर तिच्या वडिलांनी तिला माऊंट अबू असं सांगितलं. माऊंट अबू ऐकताच श्रृती आणि तिची बहिण खूश झाली होती. मे महिना असतानाही तिने पिकनिकची तयारी करताना थंडीचे कपडे हट्टाने सोबत घेतले होते. 

या सहलीसाठी ते पुण्याहून मुंबईला आले होते. माऊंट अबूला ट्रेनने जाता येतं हे श्रृतीला माहिती होते. मात्र श्रृतीचे बाबा सगळ्यांना घेऊन मुंबई विमानतळावर पोहचले. त्यावेळी त्यांनी सगळ्यांना सांगितलं की आपण माऊंट अबूला नाही तर स्वित्झर्लंडला जात आहोत. हे ऐकताच श्रृती आणि तिची बहिण प्रीती यांना अक्षरक्षा आनंदाने रडूच कोसळलं. 

विमानात गेल्यावर सीटबेल्ट लावण्यापासूनची सगळी धम्माल श्रृतीने केली. शिवाय स्वित्झर्लंडमध्येही अनेक प्रकारचे चीज आणि चॉकलेट्स खाल्ल्याची आठवण श्रृतीच्या मनात घर करुन आहे. जागतिक आंतरराष्ट्रीय पर्यटन दिनाच्या निमित्ताने श्रृतीच्या फॅन्सनी ही आठवण सोशल मीडियावर शेअर केली आहे.  

सुबोध भावे आणि श्रुती मराठे यांची मध्यवर्ती भूमिका असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर 'लग्न' या विषयावर फिरतो. लग्नाबद्दलचे विविध लोकांचे मतमतांतरे यात आपल्याला पाहायला मिळतात. शिवाय ट्रेलरच्या सुरुवातीलाच एक ख्रिश्चनधर्मीय लग्नदेखील यात आपणास दिसून येत आहे. तसेच लग्नापासून दूर पळत असलेल्या नायकाची प्रेमाबद्दलची परिभाषादेखील यात पाहायला मिळते. एकंदरीतच हा ट्रेलर पाहताना 'शुभ लग्न सावधान' हा सिनेमा संपूर्णतः कौटुंबिक मनोरंजक चित्रपट असल्याची जाणीव होते.

टॅग्स :श्रुती मराठेजागतिक पर्यटन दिन