Join us

मैत्रीची 'गुलाबी' गोष्ट! श्रुती मराठे, मृणाल कुलकर्णी आणि अश्विनी भावेंचा नवा सिनेमा, मजेशीर टीझर एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 3:17 PM

'गुलाबी' सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला असून श्रुती मराठे, मृणाल कुलकर्णी आणि अश्विनी भावे हे त्रिकुट या सिनेमात पाहायला मिळणार आहे. 

येत्या काही दिवसांत प्रेक्षकांना नवनवीन सिनेमांची मेजवानीच मिळणार आहे. बॉलिवूडबरोबरच मराठीतीलही अनेक नवीन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अशाच सिनेमांपैकी एक म्हणजे 'गुलाबी'. महिला दिनाच्या दिवशी घोषणा करण्यात आलेला हा सिनेमा अखेर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला असून श्रुती मराठे, मृणाल कुलकर्णी आणि अश्विनी भावे हे त्रिकुट या सिनेमात पाहायला मिळणार आहे. 

'गुलाबी' सिनेमातून या तिघींच्या मैत्रिची गोष्ट पाहायला मिळणार आहे. जयपूरमध्ये फिरायला गेलेल्या तिघींची गोष्ट 'गुलाबी' सिनेमातून मांडण्यात आली आहे. टीझरच्या सुरुवातीला श्रुती मराठे टिंडर अॅपवर दिसत आहे. "एवढं काम करून मी डेटवर नाही गेले तर थू आहे माझ्या जवानीवर", असं ती म्हणताना दिसत आहे. त्यानंतर एअरपोर्टवर मृणाल कुलकर्णी आणि श्रुती मराठे एकमेकींना भिडल्याचं दिसत आहे. जयपूर फिरायला गेलेल्या या तिघींची मैत्री होत असल्याचं टीझरमध्ये पाहायला मिळत आहे. 

श्रुती मराठे, मृणाल कुलकर्णी आणि अश्विनी भावे मुख्य भूमिकेत असलेल्या या सिनेमाच्या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. हा सिनेमा येत्या २२ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. 'गुलाबी' सिनेमात सुहास जोशी, निखिल आर्य, राधिका देशपांडे, प्रदीप वेलणकर हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 

टॅग्स :श्रुती मराठेसेलिब्रिटीमृणाल कुलकर्णीअश्विनी भावेसिनेमा