Join us

वाढदिवसानिमित्त शुभंकर तावडेने स्वत:लाच गिफ्ट केली महागडी गाडी, नव्या कारचं नामकरण सुद्धा केलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 11:19 IST

 ३० व्या वाढदिवसाला शुभंकर तावडेने स्वत:ला एक नवीन आलिशान कार भेट दिली.

अभिनेता शुभंकर तावडेने ( Shubhankar Tawde ) नुकताच त्याचा ३० वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्त अभिनेत्याला कुटुंब, मित्र आणि चाहत्यांकडून अनेक शुभेच्छा मिळाल्या.  ३० व्या वाढदिवसाला शुभंकर तावडेने स्वत:ला एक नवीन आलिशान कार भेट दिली. या नवीन कारचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला.

शुभंकर तावडेने स्वत:ला एक नवीन महागडी कार भेट दिली. या नव्या कोऱ्या कारचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इंस्टाग्रामवरील फोटोंमध्ये स्टायलिश आणि ग्रे रंगाची कार पाहायला मिळतेय.  शुभंकर तावडे त्याच्या नव्या कारमुळे खुप खुश आहे. एवढंच काय तर शुभंकरने आपल्या नव्या गाडीचं नामकरण देखील आहे. त्याने गाडीचे नाव 'लक्ष्मी' असे ठेवले आहे. 'लक्ष्मी'सोबतच तो या गाडीला 'फनकार' असेही म्हणतो. 

शुभंकर तावडेने पोस्टमध्ये लिहले, "३० वर्षांचा झालो… नवीन गाडी घेतली... गाडीच नाव 'लक्ष्मी' ठेवलं...  कधी मी या गाडीला 'फनकार' किंवा Fun-Car म्हणतो. तसेच माझ्या नव्या नाटकाची म्हणजेच 'विषामृत'ची घोषणाही झाली. मला तुम्हा सर्वांकडून भरभरून शुभेच्छा आणि प्रेम मिळालं… आता वाढदिवसाची पार्टी सुद्धा झाली आणि प्रचंड आनंदी आहे".

टॅग्स :मराठी अभिनेताकार