Join us

शुद्धदेसी मराठीची शॉर्ट फिल्म स्पर्धा; ५ लाखांपर्यंतची बक्षिसं जिंकण्याची संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 4:02 PM

एकापेक्षा एक भारी वेबसीरीजनंतर शुद्धदेसी मराठी चॅनेलकडून आता एका शॉर्ट फिल्म स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.

शुद्धदेसी मराठी हे मनोरंजन विश्वातील आजचं वेगाने लोकप्रिय होणारं आणि लोकांचं भरभरून मनोरंजन करणारं यूट्यूब चॅनल आहे. एकापेक्षा एक भारी वेबसीरीजनंतर शुद्धदेसी मराठी चॅनेलकडून आता एका शॉर्ट फिल्म स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. 

उदयोन्मुख, प्रयोगशील मराठी फिल्ममेकर्सना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना त्यांचं टॅलेन्ट जगभरातील लोकांना दाखवण्याची संधी मिळावी म्हणून शुद्धदेसी शॉर्ट फिल्म कॉम्पिटिशन २०२० चं आयोजन करण्यात आलं आहे. ओरिऑन मॉल पनवेलच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित केली असून विजेत्यांना ५ लाख रुपयांपर्यंतची बक्षिसं जिंकण्याची संधी मिळणार आहे.

शुद्धदेसी शॉर्ट फिल्म कॉम्पिटिशन २०२० साठी परीक्षक म्हणून मराठी सिनेसृष्टीतील तीन दिग्गज कलाकार लाभले आहेत. अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक, अभिनेत्री अश्विनी काळसेकर, अभिनेत्री क्रांती रेडकर आणि अभिनेता आदिनाथ कोठारे हे चौघे शॉर्ट फिल्मचं परीक्षण करणार आहेत. तीन सर्वोत्तम शॉर्ट फिल्मसोबतच सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या शॉर्ट फिल्मलाही पुरस्कार दिला जाणार आहे. बेस्ट शॉर्ट फिल्मच्या दिग्दर्शकाला शुद्धदेसी मराठी निर्मित शॉर्ट फिल्म दिग्दर्शित करण्याची संधी मिळणार आहे.

आपल्या टॅलेन्टला जगासमोर आणण्याची संधी असणाऱ्या स्पर्धेत तुमची शॉर्ट फिल्म पाठवण्याची शेवटची तारीख १४ फेब्रुवारी आहे. त्यासाठी कुठलंही प्रवेश शुल्क आकारलं जाणार नाही. contest.shudhdesi.com या वेबसाईटवर तुम्हाला तुमच्या शॉर्ट फिल्म अपलोड करता येतील. 

काही अटी

१) तुमची शॉर्ट फिल्म मराठी भाषेत असावी.

२) तुमची शॉर्ट फिल्म ही कमीत कमी ५ मिनिटांची आणि जास्तीत जास्त २० मिनिटांची असावी. 

३) तुमची शॉर्ट फिल्म ही याआधी कुठेही प्रदर्शित झालेली नसावी.

४) एक व्यक्ती त्याच्या ५ शॉर्ट फिल्म अपलोड करू शकते.

५) ५ लाखांपेक्षा अधिकची बक्षिसं जिंकण्याची संधी

६) सहभाग घेणाऱ्या सर्वांना सहभागाचं प्रमाणपत्र आणि टॉप ३० फिल्म्सना 'सर्टिफिकेट ऑफ एक्सिलन्स' देण्यात येईल.

७) जर तुम्हाला व्हिडीओ अपलोड करण्यात काही अडचण येत असेल तर shudhdesionline@gmail.com या ई-मेल मेल करू शकता किंवा  +91 8291232354 या क्रमांकावर व्हॉट्सअप करू शकता.

टॅग्स :शुद्ध देसी मराठीशॉर्ट फिल्मयु ट्यूब