Join us

'माझ्या नवऱ्याची बायको'मधील रेवती रिअल लाईफमध्ये आहे हॉट अँड बोल्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 07:00 IST

प्रत्येक फोटोमधील श्वेताची दिलखेचक अदांवर कोणीही फिदा होइल असेच हे फोटो आहेत.

अभिनेत्री श्वेता मेहंदळे  मीडियावर सोशल मीडियावर बरीच एक्टिव्ह असते. सोशल मीडियावर ती सुरुवातीपासून आपले फोटो शेअर करत आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्ससोबत संपर्कात असते. श्वेताने इन्स्टाग्रामवर तिचा एक ब्ल्यू रंगाच्या वनपीसमधला फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये श्वेताचा हॉट आणि बोल्ड अंदाज दिसतोय. 

श्वेताला मॉर्डन रहायला आवडतं. श्वेताचे तितकेच सुंदर आणि ग्लॅमरस फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेत. इन्स्टाग्रामवर तिचे फोटो ग्लॅमरस असण्यासह तितकेच घायाळ करणारे आहेत. या प्रत्येक फोटोमधील श्वेताची दिलखेचक अदांवर कोणीही फिदा होइल असेच हे फोटो आहेत. या सगळ्या फोटोंमध्ये श्वेताचं सौंदर्य आणखीनच खुलून गेल्याचं पाहायला मिळत आहे.

'माझ्या नव-याची बायको' या मालिकेआधी विविध मालिका आणि सिनेमांमध्ये श्वेतानं अभिनय केला आहे. 'नायक', 'या गोजिरवाण्या घरात', 'असावा सुंदर स्वप्नांचा बंगला' या मालिकांमध्ये श्वेतानं भूमिका साकारल्या आहेत.

याशिवाय 'धूम 2 धमाल', 'पाच नार एक बेजार', 'सगळं करुन भागलं', 'असा मी तसा मी', 'जावईबापू जिंदाबाद' अशा सिनेमांमध्येही श्वेताने आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. श्वेता मेहंदळे ही अभिनेता राहुल मेहंदळे याची पत्नी आहे. 'या गोजिरवाण्या घरात' या मालिकेत राहुल आणि श्वेता एकत्र झळकले होते.

टॅग्स :श्वेता मेहंदळेझी मराठीमाझ्या नवऱ्याची बायको