Join us  

सियाला का बदलायची आहे इमेज ?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2016 1:22 PM

           सिया पाटील नेहमीच प्रेक्षकांना पडदयावर ग्लॅमरस अंदाजात पाहायला मिळाली होती. मग चित्रपट असो कि ...

           सिया पाटील नेहमीच प्रेक्षकांना पडदयावर ग्लॅमरस अंदाजात पाहायला मिळाली होती. मग चित्रपट असो कि मालिका सिया हॉट भूमिकेतच जास्त दिसली होती. बॉलिवूडमध्ये देखील सियाचे हे ग्लॅमर पाहायला मिळाले होते. भागम भाग चित्रपटातील तिचे आयटम साँग चांगलेच चर्चेत आले होते. परंतु सियाला ही ग्लॅमर डॉलची इमेज सध्या बदलावीशी वाटतेय. कारण नुकतेच तिने एक नऊवारी साडीतील फोटोशूट केले आहे. हे फोटोशूट तिने कोणत्या चित्रपटासाठी केले नाही तर सहजच चेंज म्हणुन केल्याचे सियाने सांगितले. अस्सल ठसकेबाज पारंपारिक वेशातील सिया या फोटोमध्ये फारच सुंदर दिसतो आहे. हे फोटो पाहुन नक्कीच सियाला सोज्वळ भूमिका मिळू शकते. सिया नुकतीच आपल्याला फक्त तुझ्याचसाठी या चित्रपटात सालस पत्नीची भूमिका साकारताना दिसली होती. मात्र तो चित्रपट फारसा चालला नाही. त्यामुळे सियाने स्वत: हा मेकओव्हर करायचे ठरवल्याने नक्कीच आपण तिला मोठ्या पडद्यावर पारंपारिक लुकमध्ये पाहिले तर आश्चर्य वाटायला नको. बऱ्याच अभिनेत्री अशा असतात कि ज्या त्यांच्या टिपिकल इमेजमुळे त्रस्त झालेल्या असतात. प्रेक्षक आपल्याला दुसऱ्या भूमिकेत स्वीकारु शकणार नाही, अशी त्यांना भीती त्यांच्यामनात असते. म्हणून अनेक अभिनेत्री ग्लॅमरस बनण्याचा नेहमीच प्रयत्न करतात. परंतु सियाच्या बाबतीत उलट झाले आहे, असेच म्हणावे लागले. कारण प्रेक्षकांनी तिला आजपर्यंत ग्लॅमरस अभिनेत्री म्हणूनच पाहिले आहे. आता ती सर्वांना दाखवून देणार आहे कि एक अभिनेत्री म्हणून मी कोणत्याही भूमिका अगदी सहजपणे साकारु शकते.