Join us

तुझी पोरं कायम तुझ्या पाठीशी आहेत; सिद्धार्थ चांदेकरनं आईचं लग्न लावलं, खास मेसेजनं मन जिंकलं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 9:25 AM

तू माझं लग्न थाटात लावलंस, आता मी...

लग्नाला वयाचं बंधन नसतंच मुळी हे आजकाल प्रकर्षाने जाणवतंय. उतारवयात एकटेपणा नको म्हणून कित्येक जण धाडसाने पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतात. आजूबाजूला ही उदाहरणं आपण ऐकली असतीलच. हा विषय काढायचं कारण हे की 'झिम्मा' फेम मराठी अभिनेतासिद्धार्थ चांदेकरने (Siddharth Chandekar) त्याची आई सीमा चांदेकरचं दुसरं लग्न लावलं आहे. सोबतच एक खास पोस्टही शेअर केली आहे.

काय आहे सिद्धार्थची पोस्ट?

Happy Second Innings आई! तुला पण एक जोडीदार हवा, तुझ्या मुलांव्यतिरिक्त एक आयुष्य हवं, तुझं एक स्वतंत्र सुंदर जग हवं, हे कधी लक्षातच नाही आलं गं माझ्या. किती ते एकटं एकटं रहायचं? तू आत्ता पर्यंत सगळ्यांचा विचार केलास, सगळ्यांसाठी पाय झिजवलेस. आता फक्त तुझा आणि तुझ्या नव्या जोडीदाराचा विचार कर. तुझी पोरं कायम तुझ्या पाठीशी आहेत. तू माझं लग्न थाटात लावलंस, आता मी तुझं लग्न लावतोय. माझ्या आयुष्यातलं अजून एक सुंदर लग्न. माझ्या आईचं!I love you आई!Happy Married Life #उत्तरार्ध

सिद्धार्थ आईच्या अत्यंत जवळ आहे. तो त्याचं संपूर्ण नाव सिद्धार्थ सीमा चांदेकर असंच लावतो. त्याची आई सीमा चांदेकर या देखील अभिनेत्री आहेत. त्यांनी सिद्धार्थच्याच 'जीवलगा' या मालिकेत काम केलं होतं. 

मुलांनी आईचं लग्न लावावं ही संकल्पना हळूहळू समाजात रुजत आहे. आई किंवा बाबा एकटे पडू शकतात. त्यांना पुढील आयुष्यात सोबतीला जोडीदार असावा असं वाटणं साहजिकच आहे. सिद्धार्थनेही तेच केलं. त्याच्या पोस्टवर सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी कमेंट करत त्याचं कौतुक केलं आहे.  तसंच सिद्धार्थच्या आईचं अभिनंदन केलं आहे.

टॅग्स :सिद्धार्थ चांदेकरमराठी अभिनेतालग्नसोशल मीडियापरिवार