अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर हे दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. याबाबतची कबूली खुद्द या दोघांनीच काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. ते दोघे नेहमीच एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. सिद्धार्थने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकताच एक फोटो पोस्ट केला असून हा फोटो नेटिझन्सचे लक्ष वेधून घेत आहे.
सिद्धार्थ चांदेकरने मितालीचा एक फोटो इन्स्टावर नुकताच पोस्ट केला आहे. या फोटोत मिताली खूपच गोड हसत असून तिच्या दोन्ही हातात आपल्याला पिझ्झा पाहायला मिळत आहे. या फोटोसोबतच सिद्धार्थने एक छान कॅप्शन लिहिली आहे. त्याने या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, स्वयंपाक उत्तम... काळजी मिटली. त्याच्या या कॅप्शनवर मुलगी सुगरण आहे, नशिबवान आहेस, एवढेच नव्हे तर आता लवकरच लग्न करून टाका अशाप्रकारच्या प्रतिक्रिया सिद्धार्थ आणि मिताली यांच्या चाहत्यांनी दिल्या आहेत.
सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकर यांचे सोशल मीडियावर असलेले एकत्र फोटो पाहून त्यांच्या चाहत्यांमध्ये या दोघांचे अफेअर असल्याच्या चर्चा बऱ्याच काळापासून रंगल्या होत्या. मितालीने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकल्यानंतर हे दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याचे निश्चित झाले होते. मितालीने सिद्धार्थ आणि मित्रमंडळींसोबतचा फोटो शेअर करून लिहिले होते की, हे सांगायचे विसरले होते. सिद्धार्थने मला प्रपोझ केले आणि मी त्याला होकार दिला आहे. अॉफिशिएल मी त्याने दिलेली रिंग स्वीकारली आहे. मितालीच्या या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव झाला होता तर सिद्धार्थने मितालीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत इन्स्टाग्रामवर लिहिले होते की, हॅप्पी बर्थडे. बॅटमॅनपेक्षा जास्त प्रेम तुझ्यावर करतो. देवाचा आभारी आहे की आपण भेटलो. नेहमीप्रमाणे हसत रहा.
मिताली आणि सिद्धार्थने त्यांच्या नात्याबद्दल खुलासा सोशल मीडियावर करून त्यांच्या नात्यबाबतच्या चर्चेला पूर्णविराम दिला होता. आता ते दोघे लग्न कधी करणार याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना लागली आहे हे त्यांच्या प्रतिक्रियांवरून दिसून येत आहे.