Join us

"मराठी इंडस्ट्रीमध्ये पुणे लॉबी आहे का ?" सिद्धार्थ चांदेकरने मांडलं स्पष्ट मत; म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 8:00 PM

नुकत्याच दिलेल्या मुलाखती सिद्धार्थ मराठी इंडस्ट्रीवर भाष्य केले.

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर  (Siddharth Chandekar) मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यानं विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले आहे.  सिद्धार्थ बऱ्याचदा त्याच्या बोल्ड आणि फॉर्वर्ड विचारांमुळे चर्चेत येत असतो.  विविध विषयावर तो रोखठोक मत मांडतं असतो. नुकत्याच दिलेल्या मुलाखती सिद्धार्थ मराठी इंडस्ट्रीवर भाष्य केले.

नुकतेच सिद्धार्थ चांदेकरने कॉकटेल स्टुडिओला मुलाखत दिली. यावेळी त्याने व्यवसायीक आणि खाजगी आयुष्याबद्दल मोठे खुलासे केले. यावेळी त्याला मराठी इंडस्ट्रीमधल्या पुणे लॉबीविषयी काय सांगशील, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने (siddharth chandekar) स्पष्ट मत मांडलं. सिद्धार्थ म्हणाला, 'पुणे लॉबी आहे असा कधी मला अनुभव आला नाहीये. पुण्यातील जे लोक येतात ते भारीच असतात. पण अशी कुठलीही लॉबी आहे, असं मला वाटतं नाही'.

सिद्धार्थ म्हणाला, 'एक तर आपली इंडस्ट्री खूप लहान आहे. त्यात जर अशा लॉब्या व्हायल्या लागल्या, तर मला नाही वाटत चांगले कोलॅबोरेशन होऊ शकतील. पण जर का अशा काही लॉबीज असतील तर त्या पहिल्या मोडाव्यात. पण मला हेही वाटतं की प्रत्येकाचा त्या त्या माणसासोबत काम करण्याचा एक कंफर्ट झोन असतो. जसं की मी आता हेमंतबरोबर काम करतोय. तो पुण्याचा आहे म्हणून नाही तर तो गेली वीस वर्ष माझा मित्र आहे, तो उत्तम दिग्दर्शक आहे म्हणून मी त्याच्याबरोबर काम करतो'

पुढे तो म्हणाला, 'हेमंतसारखेच आदित्य पोतदार असेल. अशी बरीच मंडळी आहेत, जी पुण्याची आहेत.  म्हणून मी त्यांच्याबरोबर काम करतो असं काही नाही. मला वाटतं की अशी लॉबी जर का असेल तर ती पहिली बंद व्हावी आणि वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या लोकांबरोबर कामं करावीत. मग भले ते काम कधी चांगलं होईल, कधी फसेल पण कामात प्रयोग होत रहावेत', असं सिद्धार्थ म्हणाला. 

टॅग्स :सिद्धार्थ चांदेकरसेलिब्रिटीपुणे