Join us

सिद्धार्थ जाधव मराठी सिनेइंडस्ट्रीतल्या या अभिनेत्रीला म्हणतो 'बंड्या', अभिनेत्याची ती आहे बेस्ट फ्रेंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2023 19:04 IST

अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) मराठी सिनेइंडस्ट्रीतला प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. त्याने फक्त मराठीतच नाही तर बॉलिवूडमध्ये आपली छाप उमटविली आहे.

अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) मराठी सिनेइंडस्ट्रीतला प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. त्याने फक्त मराठीतच नाही तर बॉलिवूडमध्ये आपली छाप उमटविली आहे. त्याच्या कारकीर्दीत आतापर्यंत बऱ्याच कलाकारांसोबत काम केले आहे. त्यांच्यासोबत काम करता करता त्यांच्यासोबत त्याची चांगली मैत्रीदेखील झाली आहे. नुकतेच त्याने लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत सिनेइंडस्ट्रीतील त्याच्या बेस्ट फ्रेंडबद्दल सांगितले. इतकेच नाही तर त्याने तिला बंड्या म्हणत असल्याचाही खुलासा केला. बरं, आता कोण असेल त्याची बेस्ट फ्रेंड हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल ना. तर आम्ही तुम्हाला सांगतो तिच्याबद्दल.

अभिनेता सिद्धार्थ जाधवने लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या बेस्ट फ्रेंडबद्दल सांगितले. अभिनेत्री तेजस्विनी पंडित त्याची बेस्ट फ्रेंड आहे आणि तिला तो बंड्या अशी हाक मारतो. तो म्हणाला की, ''माझ्या आयुष्यात खूप जवळची आणि इंडस्ट्रीतीस बेस्टेस्ट फ्रेंड तेजस्विनी पंडित आहे. कारण जो कनेक्ट त्या व्यक्तीबद्दल आहे तो अत्यंत पॉझिटिव्ह, प्रचंड फोकस आहे. तेजस्विनी चांगली लिस्टनर आहे. मी हा गुण हळू हळू घेतला आहे. तिच्याकडून मी ऐकायला शिकलो.'' 

तो पुढे म्हणाला की, ''आमच्यात चांगलं बॉण्डिंग ये रे ये रे पैसाच्या वेळी खूप छान झाले. यात संजू दादा, उमेश कामत, तेजस्विनी पंडित आणि मी असे आम्ही चौघे पॅशनेटली एकत्र आलो होतो. तेजस्विनी पंडितला आम्ही बंड्या बोलतो. हा चित्रपट खूप चांगला झाला. या चित्रपटादरम्यान आमच्यात चांगलं बॉण्डिंग झालं. अजूनही ही मैत्री टिकून आहे. मैत्रीण म्हणून तेजस्विनी पंडित खूप मोठा फॅक्ट आहे. ती नेहमी सपोर्ट करत असते.''

टॅग्स :सिद्धार्थ जाधवतेजस्विनी पंडित