Join us

"मी दहाव्या मिनिटाला तिथून निघालो, कारण...", रणवीर-दीपिकाच्या लग्नाला गेलेल्या सिद्धार्थसोबत काय घडलं?

By देवेंद्र जाधव | Updated: March 27, 2025 11:05 IST

Siddharth Jadhav Left Ranveer's Wedding: रणवीर सिंग-दीपिका पादुकोणच्या लग्नाला गेल्यावर सिद्धार्थ जाधवसोबत काय घडलं, याचा खुलासा अभिनेत्याने केलाय (siddharth jadhav)

अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) हा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. मराठी मालिका, सिनेमे, नाटक करुन आज सिद्धार्थ जाधवने बॉलिवूडमध्येही स्वतःची ओळख मिळवली  आहे. इतकंच नव्हे तर अलीकडे विजय सेतुपतीसोबत सिद्धार्थने साऊथ इंडस्ट्रीतही काम केलंय. सिद्धार्थने नुकत्याच एका मुलाखतीत तो रणवीर सिंग-दीपिका पादुकोणच्या (Ranveer Singh) लग्नाला गेल्यावर तिथे काय घडलं, याचा खुलासा केला.

सिद्धार्थसोबत रणवीर-दीपिकाच्या लग्नात काय घडलं

सिद्धार्थने अमोल परचुरेंच्या कॅचअप या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, "मी जेव्हा रणवीर सिंग सरांच्या आणि दीपिका मॅमच्या लग्नाला गेलो होतो. अमिताभ बच्चनपासून भारतरत्न सचिन तेंडुलकर सरांपर्यंत सगळी माणसं तिथे होती. मी रणवीर सरांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर दहाव्या मिनिटाला तृप्तीला सांगितलं, चल इथून जाऊया. लग्नाला जायच्या अगोदर खूप उत्सुक होतो. रणवीर सिंग सरांना भेटलो आणि आसपास सगळ्यांना बघत होतो. त्यावेळी मला दरदरुन घाम फुटला. मी दहाव्या मिनिटाला तृप्तीला जाऊया म्हणून सांगितलं.  तृप्ती थांब म्हणत होती." 

"मादाम तुसा म्यूझियममध्ये कसे पुतळे असतात आणि आपण त्यांना बघत असतो, तशी अवस्था माझी झाली होती. माझ्या आसपास जिवंत माणसं वावरत होती ज्यांना आपण बघत आलोय. कारण मी ज्या वसाहतीतून आलोय, जिथे मी पडद्यावर या लोकांना पाहिलंय, जिथे मी या लोकांना भेटेल वाटलं नव्हतं, कधी एकांकिका करताना पुढे नाटक सिनेमे करेल असं वाटलं नव्हतं. तो पोरगा आहे मी. त्यामुळे माणूस म्हणून हे क्षण जगण्याचा मी प्रयत्न करतो." 

टॅग्स :सिद्धार्थ जाधवरणवीर सिंगदीपिका पादुकोणबॉलिवूडमराठी अभिनेताव्हायरल व्हिडिओ