मराठीबरोबरच हिंदी सिनेसृष्टी गाजवणारा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव. अभिनयाबरोबरच त्याच्या स्टाइलचे लाखो चाहते आहेत. कॉलेज जीवनापासून अभिनयाची सुरुवात केलेला सिद्धार्थ आज मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सिद्धार्थने त्याच्या कलाविश्वातील करिअरवर भाष्य केलं. यावेळी त्याने चित्रपटासाठी घेतलेल्या मानधनाबद्दलही सांगितलं.
सिद्धार्थने नुकतीच राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत सिद्धार्थला कलाविश्वात पहिली कमाई किती केली होती? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देत सिद्धार्थ म्हणाला, "'तुमचा मुलगा करतो काय' यासाठी मला दोनशे रुपये मिळाले होते. ती मी आईला दिली होती." पुढे सिद्धार्थने मराठी चित्रपटासाठी घेतलेल्या एक लाख रुपयांच्या मानधनाबद्दलही भाष्य केलं. "एक लाख रुपये मानधन मिळालेला पहिला मराठी चित्रपट माझ्या लक्षात आहे," असं सिद्धार्थने सांगितलं.
"एवढी दुनियादारी बघितलेला माणूस...", संजय जाधव यांच्यासाठी कुशल बद्रिकेची खास पोस्ट
पुढे सिद्धार्थ म्हणाला, "उलाढाल चित्रपटासाठी मला एक लाख रुपयांचं मानधन मिळालं होतं. त्यासाठी मी भरत जाधव सरांचे आभार मानतो. तेव्हा मी साडे माडे तीन चित्रपटाचं लोणावळ्यात शूटिंग करत होतो. तिथे अजय सरपोतदार सर आले होते. खूप प्रेमळ माणूस...ते आले आणि मला म्हणाले...मला माहितीये तू खूप पैसे घेत असशील पण, या चित्रपटासाठी मी तुला एक लाख रुपये देईन. आणि तेव्हा मला दहा, पंधरा किंवा २ हजार असं मानधन मिळायचं. तेव्हा मला खूप छान वाटलं होतं. एका सिनेमासाठी एक लाख रुपये यानेच मी भारावून गेलो होतो."
अभिनेता नाही तर सिद्धार्थ जाधवला व्हायचं होतं पोलीस, खुलासा करत म्हणाला, "मी एनसीसी..."
सिद्धार्थ जाधवने अनेक नाटक, मालिका आणि चित्रपटांत काम करुन प्रेक्षांचं मनोरंजन केलं आहे. मराठीबरोबरच हिंदी सिनेसृष्टीही त्याने गाजवली. सिद्धार्थ 'अफलातून' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २१ जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.