सिद्धार्थ आणि मितालीचं व्हेकेशन इन गोवा,सोशल मीडियावर शेअर केले खास फोटो
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2018 6:57 AM
चित्रपटसृष्टीत दिवसागणिक नाती कशी बदलतात हे सांगणं कठीण.आज रिलेशनशिपमध्ये असणारे कपल उद्या एकत्र दिसतीलच असं नाही.त्यामुळेच कितने अजीब रिश्ते ...
चित्रपटसृष्टीत दिवसागणिक नाती कशी बदलतात हे सांगणं कठीण.आज रिलेशनशिपमध्ये असणारे कपल उद्या एकत्र दिसतीलच असं नाही.त्यामुळेच कितने अजीब रिश्ते है यहाँ पे या गाण्याच्याओळी सेलिब्रिटींसाठी तंतोतंत लागू पडतात.असं काहीसं मराठमोळा अभिनेता आणि रोमँटिक नायक सिद्धार्थ चांदेकरबाबत घडलं आहे. 'गुलाबजाम' या सिनेमाच्या यशामुळे अभिनेता सिद्धार्थ चांदेकर सध्या भलताच खुश आहे.या सिनेमातला त्याचा अभिनय रसिकांना चांगलाच भावला आहे.एकीकडे रुपेरी पडद्यावर रसिकांकडून एवढं कौतुक होत असताना स्वतःच्या आयुष्यातही सिद्धार्थ सध्या भलताच खुश आहे.सिद्धार्थ त्याच्या नव्या कथित गर्लफ्रेंडसह गोव्यात सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.सिद्धार्थची ही कथित गर्लफ्रेंड म्हणजे अभिनेत्री मिताली मयेकर. दोघंही गोव्यात सध्या एकत्र वेळ घालवत असून सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. याच स्पेशल क्षणांचे फोटो दोघांनीही आपल्या सोशल नेटवर्किंग साईटवर शेअर केले आहेत. मितालीने एक स्वतःचा हॉट आणि सेक्सी फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे. सध्या सारं काही जादू व्हावी असं भासत असून प्रत्येक क्षणाचा आनंद घेत असल्याची पोस्ट मितालीने या फोटोसह शेअर केली आहे. सिद्धार्थ आणि मिताली हे रिलेशनशिपमध्ये असल्याचे जगजाहीर आहे. व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी एकमेकांसह फोटो शेअर करुन त्यांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. याआधी सिद्धार्थ आणि शनाया फेम रसिका यांच्यातील प्रेमाची चर्चा होती. सिद्धार्थ आणि रसिका कायमच एकत्र पाहायला मिळायचे. कोणताही कार्यक्रम असो, कॉफी घेणे असो किंवा मग सिनेमाला जाणं असो दोघंही त्याचे फोटो रसिकांसह सोशल मीडियावर शेअर करत. मात्र दोघांमध्ये काही तरी बिनसल्याची सध्या चर्चा आहे. याच दरम्यान सिद्धार्थच्या आयुष्यात मितालीने एंट्री घेतली. दोघांमध्ये प्रेमांकुर फुलले असून दोघांचं नातं दिवसेंदिवस बहरत चाललं आहे. दोघांनीही खास असे सेम टू सेम असे टॅटू काढून आपल्या प्रेमाची कबुलीच दिली आहे.cnxoldfiles/a>या व्हिडिओत सिद्धार्थ मितालीला 'मी काही तुझा भाऊ नाही, मला भाऊ म्हणू नको' असे म्हणत होता तर दुसरीकडे मिताली आणि सिद्धार्थने मनगटावर एकत्र टॅटू देखील काढले होते.त्यामुळे सिद्धार्थ आणि मितालीच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चांना चांगलाच उधाण आले होते.