Join us

मी त्याच्या प्रेमात पडले कारण..., मिताली मयेकरची नवरोबासाठी खास बर्थ डे पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 1:11 PM

Sidharth Chandekar Birthday : सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर या नवरा-बायकोच्या प्रेमाचा गोडवा तो काय सांगावा. विश्वास बसत नसेल तर मितालीची ही पोस्ट वाचा. आज सिद्धार्थचा वाढदिवस. नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त मितालीनं एक खास पोस्ट शेअर केली आहे.

 Sidharth Chandekar Birthday : मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर ( Sidharth Chandekar ) आणि त्याची पत्नी म्हणजेच अभिनेत्री मिताली मयेकर   (Mitali mayekar) हे सर्वांचं लाडकं कपल. दोघंही सतत चर्चेत असतात. एकमेकांसाठी रोमॅन्टिक पोस्ट शेअर करताना दिसतात. या नवरा-बायकोच्या प्रेमाचा गोडवा तो काय सांगावा. विश्वास बसत नसेल तर मितालीची ही पोस्ट वाचा. होय, आज सिद्धार्थचा वाढदिवस. नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त मितालीनं एक खास पोस्ट शेअर केली आहे.

मिताली लिहिते,

‘तुम्ही पहिल्यांदा त्याच्या प्रेमात का पडता? जरा आठवा..जीएसटी कसा भरायचा हे त्याला माहीत होते म्हणून? की तो अप्रतिम खिचडी बनवतो म्हणून?की तो स्वयंपाकाचा ओटो स्वच्छ ठेवतो म्हणून? की तो डिनर डेट प्लॅन करतो म्हणून? यात चुकीचं नाही.. पण मी त्याच्या प्रेमात पडले कारण,त्याने मला नव्या साहसी जगाचं वचन दिलं. कारण आम्हाला एकच म्युझिक आवडतं (आम्ही प्रयत्न करतो). कारण आम्ही विक्षिप्त होतो आणि आजही आहोत. कारण तो माझा जॅक पर्सन आहे(मी खूप प्रयत्न करतेय त्याच्यासाठी योग्य रिबेका बनण्यासाठी)  कारण त्याने मला पहिल्यांदाच स्वतंत्र असल्याची जाणीव करुन दिली. 

मी त्याच्या नजरेत स्वत:ला पाहिलं. तो माझा जिवलग मित्र आहे. एखाद्या पुण्याच्या मुलासाठी मुंबईच्या मुलीला भेटणं कितीही अशक्य असलं तरी मला माझ्या जोडीदाराला भेटून आत्मा प्रज्वलित करणारी एखादी ठिणगी पेटल्यासारखं वाटलं...सिद्धार्थ तू माझ्यासाठी अजूनही एक स्वप्नातील व्यक्ती आहेस.  मी तुझ्यासाठी उत्तम आणि उत्तम बनण्याचा प्रयत्न करेन.. कारण तू नेहमी माझ्यासाठी नेहमी तसं बनण्याचा प्रयत्न करतोस...’, अशी रोमॅन्टिक पोस्ट मितालीनं सिद्धार्थसाठी शेअर केली आहे.

टॅग्स :मिताली मयेकरसिद्धार्थ चांदेकर