27 मार्च विश्व रंगमंच दिवशी “थिएटर ऑफ रेलेवंस” साजरी करणार सिल्वर जुबली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2018 7:06 AM
“थिएटर ऑफ रेलेवंस” नाट्य सिद्धांताची 25 वी वर्षगाठ साजरी करत आपल्या थिएटर प्रतिबद्धतेचा 3 दिवसीय नाट्य उत्सव महाराष्ट्राच्या ठाणे ...
“थिएटर ऑफ रेलेवंस” नाट्य सिद्धांताची 25 वी वर्षगाठ साजरी करत आपल्या थिएटर प्रतिबद्धतेचा 3 दिवसीय नाट्य उत्सव महाराष्ट्राच्या ठाणे शहरात 27-28-29 मार्च, 2018 रोजी आयोजित केला जाणार आहे. या निमित्ताने यांत्रिक होत जाणाऱ्या युगात मानवी संवेदना जागवत, कला आणि कलाकारांना वस्तुकरणातून मुक्त करत आणि अर्ध्या लोकसंख्येच्या हक्कांच्या लढाईला प्रबळतेने आपल्या समोर सादर करत आहेत. रंग चिंतक मंजुल भारद्वाज रचित तीन क्लासिक नाट्य सादर केली जाणार आहेत. आजच्या यांत्रिकीकरणाच्या युगात मनुष्य रुपी देहात माणुसकीला शोधणारे नाटक "गर्भ", अनहद नाद –Unheard Sounds of Universe” आणि न्याय आणि समतेचा आवाज म्हणजे नाटक “न्याय के भंवर में भंवरी”! 10 ऑगस्ट, 2017 रोजी दिल्ली पासून सुरू झालेला “थिएटर ऑफ़ रेलेवंस’ नाट्य उत्सव, मुंबई, पनवेल मध्ये प्रत्येक रंग संभावनेला अंकुरित करत आता ठाणे (महाराष्ट्र) मध्ये 27-28-29 मार्च 2018 रोजी “गडकरी रंगायतन” मध्ये होणार आहे! प्रत्येक रंगकर्मीला प्रोत्साहित करणारे एक रंग आंदोलन आहे “थिएटर ऑफ़ रेलेवंस”... 25 वर्षांपासून सतत सरकारी, नीम सरकारी, कॉर्पोरेटफंडिंग किंवा कोणत्याही देशी विदेशी अनुदाना पासून मुक्त. सरकारच्या 300 ते 100 करोड च्या अनुमानित संस्कृति संवर्धन बजेट च्या विरुद्ध 'प्रेक्षक' सहभागी तेने उभे आहे आमचे रंग आंदोलन ... मुंबई पासून मणिपूर पर्यंत!“थिएटर ऑफ़ रेलेवंस” ने जीवनाला नाटकाशी जोडून रंग चेतनेचा उदय करून त्याला लोकांशी जोडले आहे. आपल्या नाट्य कार्यशाळेत सहभागींना मंच, नाटक आणि जीवनाचा संबंध, नाट्यलेखन, अभिनय, दिग्दर्शन, समीक्षा, नेपथ्य, रंगशिल्प, रंगभूषा आदि विभिन्न रंग पैलूंवर प्रशिक्षित केले आहे आणि कलात्मक क्षमतेला देवी वरदानापासून बाजूला सारून वैज्ञानिक दृष्टिकोणाच्या दिशेने वळवले आहे. 25 वर्षांत 16 हजाराहून अधिक रंगकर्मींनी 1000 कार्यशाळांमध्ये भाग घेतला. जिथे भांडवलदारी कलाकार कधीही आपली कलात्मक सामाजिक जबाबदारी घेत नाहीत, म्हणूनच "कलेसाठी कला" या चक्रव्यूहात फसून आहेत आणि भोगवादी कलेच्या जात्यात दळून दळून संपत चालले आहेत.