के. आर. म्युझिक प्रस्तुत "राजा शिवाजी राजा " हे छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारीत नवे कोरे गीत एका नव्या स्वरूपात लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्याचे नुकतेच छायाचित्रण झाले असून हे गाणे लवकरच प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.
राजा शिवाजी राजा हे गाणे सुप्रसिद्ध गायिका कविता राम यांनी स्वरबद्ध केले आहे. या गाण्याचे गीतकार मंदार चोळकर असून या गाण्याचे संगीत संयोजन प्रफुल -स्वप्निल यांनी केले आहे. या गाण्याचे रेकॉर्डिंग आजिवासन स्टुडिओमध्ये पार पडले आहे. ध्वनिमुद्रण आणि ध्वनीमिश्रण - अवधूत वाडकर यांनी केले आहे.बासरीची सुरेल साथ वरद कठापुरकर यांची लाभलेली आहे.
कविता राम यांनी सांगितले की, राजा शिवाजी राजा या गाण्याचा अनुभव खूपच छान होता. या गाण्याबाबत मी खूपच उत्सुक आहे. हे गाणे नक्कीच प्रेक्षकांना आवडेल, अशी मला आशा आहे.
के. आर. म्युझिक कंपनी ची प्रमुख कविता राम यांनी या गाण्याची निर्मिती केली आहे. लवकरच हे गाणे कविता राम यांच्या युट्युब चॅनेलवर बघायला मिळेल.
कविता राम यांनी "ये रिश्ता क्या कहलाता है", "गोदभराई", "मेरे घर आयी नन्हीं परी", "कैरी", "साथ निभाना साथिया", या मालिकांसाठी तर "या टोपीखाली दडलंय काय", "लाज राखते वंशाची", "दुर्गा म्हणत्यात मला", "शिनमा", "थँक यू विठठला", "हक्क" "लादेन आला रे", "नगरसेवक" यांसारख्या मराठी तर "गब्बर इज बॅक", "सिंग इज किंग" या हिंदी सिनेमांसाठी गाणी गायली आहेत.