Join us

'आम्हाला काय मुलं झाली नाहीत?' वर्किंग वूमनला टोमणे मारणाऱ्यांच्या डोळ्यात सावनीने घातलं अंजन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 4:37 PM

Savaniee Ravindrra: पोस्टपार्टम डिप्रेशनविषयी सावनीने तिचं मत मांडलं.

आपल्या सुमधूर आवाजाने प्रेक्षकांना आपलं करणारी लोकप्रिय मराठी गायिका म्हणजे सावनी रविंद्र (Savaniee Ravindrra). राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सावनीचं सध्या बाईपण भारी देवा या सिनेमातील मंगळागौरीचं गाणं तुफान गाजतंय. सावनी आज यशस्वी आणि तितकीच लोकप्रिय गायिका म्हणून ओळखली जाते. विशेष म्हणजे करिअरची गाडी ओढत असतानाच ती तिच्यातलं आईपण सुद्धा जपतीये. सावनी एका लहान मुलीची आई असून तिने नुकतंच पोस्टपार्ट डिप्रेशनविषयी भाष्य केलं आहे.

सावनीने अलिकडेच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने पोस्टपार्टम डिप्रेशनविषयी तिचं मत मांडलं. तसंच ज्या स्त्रिया प्रेग्नंसीनंतर डिप्रेशनमध्ये जातात त्यांना एक छानसा सल्लाही दिला आहे.

"जेव्हा तुम्ही ठरवता की तुम्हाला करिअर सुद्धा करायचंय आणि बाळाकडेही पाहायचंय. तर, त्यावेळी तुमची छान गोड तारेवरची कसरत होत असते. तरी ती कधी फर्स्टस्ट्रेटिंग असते. पण, त्यातही एक वेगळं समाधान असतं. रोज मी स्वत:ला सिद्ध करत असते. माझा रोजचा दिवस नवीन असतो. नवीन आव्हान असतात. पण, या सगळ्यात आपलं बाळ आपल्याला ताकद देतं. त्याच्याकडे पाहून काम करायचा आणखी हुरुप येतो. ही परिस्थिती प्रत्येक मुलीच्या आयुष्यात आई झाल्यानंतर येतेच", असं सावनी म्हणाली.

पुढे ती म्हणते, "आजकालच्या काळात पोस्ट पार्टम डिप्रेशनची फ्रेज काही जणांना खोटी वाटते. त्यांना असं वाटतं की आम्हाला काय मुलं झाली नाहीत का? पण, मी त्यांना सांगू इच्छिते तो काळ वेगळा होता. त्या काळात येणारे चॅलेंजेस वेगळी होती. तेव्हाची नैसर्गित परिस्थिती वेगळी होती. आताच प्रदूषण, ट्रॅफिक या सगळ्याचा आपल्या मनावर खूप परिणाम होतो.  करिअर करणाऱ्या मुलीला तिचं काम करायचंय पण तिच्या मनात सतत बाळाचे विचार येत असतात. आताच्या वर्किंग वूमनला कोणकोणत्या टप्प्यातून जावं लागतं हे मी शब्दांत नाही सांगू शकत. पण, स्वत:वर विश्वास असेल, नवरा,कुटुंबाची साथ असेल तर पोस्टपार्टमनंतर येणाऱ्या डिप्रेशनमधून नक्कीच बाहेर पडता येतं." 

टॅग्स :सिनेमासेलिब्रिटीटेलिव्हिजन