Join us

छोट्या पडद्यावरील खलनायक महेश शेट्टी दिसणार ह्या सिनेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 4:50 PM

सुपरहिट ठरलेल्या मल्याळम ‘अंगमली डायरीझ’ चित्रपटाचा मराठी रिमेक असलेला ‘कोल्हापूर डायरीझ’ हा वेगळ्या जॉनरचा चित्रपट प्रेक्षकांना नवीन वर्षात पाहायला मिळणार आहे.

ठळक मुद्दे'अंगमाली डायरीज' या मल्याळम चित्रपटाचा मराठी रिमेक 'कोल्हापूर डायरीज' महेश शेट्टी ‘कोल्हापूर डायरीझ’मध्ये साकारणार खलनायक

सुपरहिट ठरलेल्या मल्याळम ‘अंगमली डायरीझ’ चित्रपटाचा मराठी रिमेक असलेला ‘कोल्हापूर डायरीझ’ हा वेगळ्या जॉनरचा चित्रपट प्रेक्षकांना नवीन वर्षात पाहायला मिळणार आहे. अवधूत गुप्ते प्रस्तुत, वजिर सिंह निर्मित आणि जो राजन दिग्दर्शित ‘कोल्हापूर डायरीझ’मध्ये भूषण नानासाहेब पाटील महत्त्वाची भूमिका साकारणार असून भूषणच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्या या चित्रपटातील लूकची झलक सोशल मिडीयावर दाखवण्यात आली होती.

चित्रपटाचा नायक जितक्या ताकदीचा आणि महत्त्वाचा असतो तितकाच ताकदीचा खलनायक जर असेल तर चित्रपटाविषयीची उत्सुकता नेहमीच वाढते. हल्ली, खलनायकाची भूमिका देखील प्रेक्षकांची मने जिंकतात. ‘कोल्हापूर डायरीझ’मध्ये भूषणच्या समोर कोणता खलनायक असणार याचा खुलासा नुकताच करण्यात आला आहे. छोट्या पडद्यावर खलनायकाची भूमिका साकारणारा महेश शेट्टी ‘कोल्हापूर डायरीझ’मध्ये ‘अण्णा’ हे खलनायकाचे पात्र साकारताना दिसणार आहे. छोट्या पडद्यावर दरारा निर्माण केल्यावर महेश शेट्टी अण्णाच्या रुपातून लवकरच मोठ्या पडद्यावर त्याचा दरारा निर्माण करणार आहे. मुळात, नायक आणि खलनायक या दोन्ही पात्रांचा लूक प्रदर्शित झाल्यावर प्रत्येकाला या चित्रपटाची निदान एक तरी झलक लवकरात लवकर मिळावी अशी उत्सुकता नक्कीच असणार आहे.अंगमाली डायरीज चित्रपट क्राईम ड्रामावर आधारीत आहे. यात अंगमाली या ठिकाणी राहणाऱ्या विन्सेन्ट पेपे या युवकाची कथा रेखाटण्यात आली आहे. तो एका घटनेमुळे गुन्हेगारी जगात सामील होतो आणि मग, त्याला कोणकोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो, हे यात दाखवण्यात आले आहे. मुव्हिंग पिक्चर्सची प्रस्तुती असलेला आणि जो राजन यांचे उत्कृष्ट दिग्दर्शन असलेला ‘कोल्हापूर डायरीझ’ नवीन वर्षात प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :अवधुत गुप्ते