Join us

स्मिता का करते तारेवरची कसरत?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2016 1:34 PM

कलाकारांचे आयुष्य हे धावपळीचे असते. नाटक, मालिका, चित्रपट यांच्या व्यग्र शेडयुल्डमध्ये ते अडकलेले असतात. त्यांना स्वत:साठी वेळ देणे ही ...

कलाकारांचे आयुष्य हे धावपळीचे असते. नाटक, मालिका, चित्रपट यांच्या व्यग्र शेडयुल्डमध्ये ते अडकलेले असतात. त्यांना स्वत:साठी वेळ देणे ही फार कठीण असते. अशामध्ये जर चित्रपटाचे प्रमोशन आणि नाटक हे एकाच वेळी असेल तर कलाकारांना तारेवरची कसरत करावी लागते. असेच काहीसे अभिनेत्री स्मिता गोंदकर हिच्याबाबतीत घडत आहे. काही दिवसातच स्मिताचा भय हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती मेहनत घेताना पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर ती अभिनेता भरत जाधव यांच्यासोबतदेखील सौजन्याची ऐशीतैशी या नाटकामध्ये दिसत आहे. त्यामुळे चित्रपटाचे प्रमोशन आणि नाटकाचे शेडयुल्ड हे दोन्ही सांभाळताना स्मिताला अगदी तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे पाहायला मिळत आहे. तिच्या या धावपळीविषयी स्मिता लोकमत सीएनएक्सला सांगते, खर सांगू का नाटक, चित्रपटाचे प्रमोशन आणि इतर या सर्व गोष्टी सांभाळताना नाकी नऊ येत आहे. मात्र यामध्ये मला थकवा किवा कंटाळावगैरे काही येत नाही. कारण हे माझे कामच आहे. माझे माझ्या कामावर खूप प्रेम आहे. तसेच नाटक म्हटले तर, नाटकाची कमेंन्टमेट आणि रंगभूमीविषयी असलेले प्रेम यासाठी मी किती ही बिझी असले तरी वेळ हा काढणारच. कारण वेळ ही मिळत नसते ती काढावी लागत असते. त्यामुळे काम के लिए कुछ भी म्हणत स्मिताने तारेवरची कसरत ही प्रत्येकच कलाकाराला करावी लागत असते असेदेखील यावेळी म्हणाली. यापूर्वी स्मिताने पप्पी दे..पप्पी दे या लोकप्रिय गाण्यातून प्रेक्षकांच्या मनामध्ये जागा निर्माण केली आहे. तसेच तिने गडबड गोंधळ, हिप हिप हुर्रे, माझ्या नवºयाची बायको, वॉन्टेड बायको नंबर वन असे अनेक चित्रपटदेखील केले आहेत.