'पप्पी दे पप्पी दे पारूला...' असे म्हणत सर्वांना आपल्या तालावर थिरकायला लावणारी अभिनेत्री स्मिता गोंदकर मराठी 'बिग बॉस' या रिएलिटी शोमधून घराघरात पोहचली. या शोमध्ये ती टॉप ३ पर्यंत पोहचली होती. या शोमध्ये टास्क पूर्ण करीत स्मिताने रसिकांना चांगलीच भुरळ पाडली आहे. या शो मधून बाहेर पडल्यानंतर मित्रमैत्रिणींसोबत जंगी सेलिब्रेशन केल्यानंतर आता ती वेगळ्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. अभिनेत्री स्मिता गोंदकर लवकरच एका गाण्यात दिसणार आहे. या गाण्याचे नाव आहे 'लाजरान साजरा'. या गाण्यातील फर्स्ट लूक नुकताच स्मिताने सोशल मीडियावर शेअर केला आहे. 'लाजरान साजरा' या गाण्याचे प्रस्तुतकर्ते व्हिडिओ पॅलेस व पायोनिर प्रोडक्शन असून लवकरच हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.स्मिताने सोशल मीडियावर गाण्याचा फर्स्ट लूक शेअर करून लिहिले की 'लाजरान साजरा' गाण्याचे फर्स्ट लूक शेअर करताना मी खूप उत्सुक असून लवकरच हे गाणे प्रदर्शित होणार आहे.
स्मिता गोंदकरचे नवे गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2018 12:01 IST
अभिनेत्री स्मिता गोंदकर लवकरच एका गाण्यात दिसणार आहे. या गाण्याचे नाव आहे 'लाजरान साजरा'. या गाण्यातील फर्स्ट लूक नुकताच स्मिताने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
स्मिता गोंदकरचे नवे गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
ठळक मुद्देस्मिताचे नवे गाणे 'लाजरान साजरा''लाजरान साजरा' या गाण्याबाबत स्मिता उत्सुक