Join us

'ती काम चांगलं करते पण तिचा चेहरा..'; दिसण्यावरुन स्मिता तांबेला लोकांनी मारले होते टोमणे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 12:02 PM

Smita tambe: 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात स्मिताने तिला इंडस्ट्रीत कसा स्ट्रगल करावा लागला हे सांगितलं.

स्ट्रगल हा कोणत्याही व्यक्तीला चुकलेला नाही. सामान्यांपासून सेलेब्रिटींपर्यंत प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी स्ट्रगल केलाच आहे. यात सध्या मराठी कलाविश्वाती लोकप्रिय अभिनेत्री स्मिता तांबे हिची चर्चा रंगली आहे. अनेक दर्जेदार मालिका, सिनेमांमध्ये काम करणाऱ्या स्मिताला बऱ्याच वेळा इंडस्ट्रीत वाईट अनुभव आला. इतकंच नाही तर तिच्या लूकमुळे तिला रिजेक्शनचाही सामना करावा लागला.

कलाविश्वात कलाकारांच्या अभिनयासह त्यांच्या लूककडेही तितकंच लक्ष दिलं जातं. त्यामुळे प्रत्येक कलाकार स्वत:ला परफेक्ट करण्यासाठी प्रयत्न करत असतो. मात्र, स्मिताने तिच्या लूककडे लक्ष न देता तिच्या अभिनयावर फोकस केला आणि त्याचाच परिणाम आज ही मराठीसह हिंदी इंडस्ट्रीवरही राज्य करत आहे. परंतु, सुरुवातीच्या काळात तिला अनेकांनी तिच्या दिसण्यावरुन टोमणे मारले, तिची खिल्ली उडवली.  खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात बोलत असतांना तिने तिला कशाप्रकारे लोकांनी दिसण्यावरुन ट्रोल केलं हे सांगितलं. 

"मी जेव्हा ऑडिशनला जायचे त्यावेळी लोक म्हणायचे, की ती काम चांगलं करते पण तिचा चेहरा कसा आहे. तिच्या चेहऱ्यावर किती खड्डे आहेत. असं कसं? कॅमेरामनला किती कष्ट घ्यावे लागतील, असं सतत लोक मला म्हणायचे. आणि, ही गोष्ट माझ्या मनाला खूप लागायची", असं स्मिता म्हणाली.

दरम्यान, उत्तम अभिनय कौशल्याच्या जोरावर स्मिताने इंडस्ट्रीत तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं. अलिकडेच तिचा 'जोराम' हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाला अनेक विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. स्मिताच्या २००९ साली आलेल्या 'जोगरा' या सिनेमालादेखील राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तसंच '72मैल एक प्रवास' या सिनेमाला सुद्धा राष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

टॅग्स :स्मिता तांबेसेलिब्रिटीसिनेमाटेलिव्हिजनबॉलिवूड