Join us

लग्नापूर्वी स्नेहल यांनी प्रवीण तरडेंना घातलेली ही मागणी, म्हणाल्या होत्या की, "आयुष्यात कधीही मला... "

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 4:01 PM

Pravin Tarde And Snehal Tarde : नुकतेच एका मुलाखतीत स्नेहल तरडे यांनी लग्नापूर्वी प्रवीण तरडेंना घातलेल्या मागणीबद्दल सांगितले.

मराठी सिनेइंडस्ट्रीतील रांगडा गडी म्हणजे लेखक, दिग्दर्शक, अभिनेता प्रवीण तरडे (Pravin Tarde). एका मागोमाग हिट चित्रपट देणारे प्रवीण तरडे घराघरात लोकप्रिय झाले आहेत. त्यांच्या प्रत्येक सिनेमातून त्यांनी समाजाला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे दर्जेदार कलाकृतींसाठी ते कायमच चर्चेत असतात.  प्रवीण यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नी स्नेहल तरडे(Snehal Tarde)देखील लोकप्रिय अभिनेत्री आहे. नुकतेच एका मुलाखतीत स्नेहल तरडे यांनी लग्नापूर्वी प्रवीण तरडेंना घातलेल्या मागणीबद्दल सांगितले.

स्नेहल तरडे या पूर्णपणे शाकाहारी आहेत आणि प्रवीण तरडे मासांहारी आहेत. त्यामुळे लग्नापूर्वी त्यांनी प्रवीण तरडेंची एक अट घातली होती. त्याबद्दल आरपारला ऑनलाइनला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, मी शाकाहारी आहे आणि प्रवीण पूर्ण मासांहारी आहे. लग्न आम्ही ज्यावेळी करायचं ठरवलं होतं त्यावेळी माझं मागणं असं एकच होतं त्याच्याकडे. बाकी मी फार प्रेमात होते. मी हे ही नाही पाहिले की तो किती पैसे कमावतोय. आमचं भविष्य काय असणार आहे. एकच गोष्ट त्याच्याकडे मागितली होती. मी त्याला म्हटलं आयुष्यात कधीही मला तू नॉनव्हेज खायला लावायचं नाही. मला त्याला हातही लावायला लावायचा नाही. हे जर तू करू शकलास. मी हात लावू शकत म्हणजे माझी अशी धारणा आहे की म्हणजे देवाने माझ्यावर ही वेळ आणलेली नाहिये की एखाद्या जीवाला जिवे मारून मी माझे पोट भरेन. ही माझी धारणा आहे. 

संकल्पनाच थोडीशी भीतीदायक वाटते..

देव न करो अशी वेळ कधी आली तर कदाचित मला नाईलाजाने ते खावे लागेल पण आता अशी वेळ देवाने माझ्यावर आणलेली नाहीये तर मला कधी त्याला हात लावायला सांगू नकोस. किंवा तुझ्यासाठी ते करायला लावू नकोस. आम्ही घरात नॉन व्हेज बनवत नाही. प्रवीण ऑफिसमध्ये बनवतो. घरात नॉन व्हेज बनवायला परवानगी नाही. माझ्या स्वयंपाकघरात शेगडीवर मेलेला प्राणी शिजतोय ही मला संकल्पनाच थोडीशी जरा भीतीदायक वाटते, असे त्या म्हणाल्या.    

टॅग्स :प्रवीण तरडे