म्हणून स्वतःला फिट आणि मेंटेन ठेवू शकते माधवी निमकर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2017 9:17 AM
अभिनेत्री अभिनयासोबतच फिटनेसबाबतही अधिक जागरुक असताता. फिट राहण्यासाठी वेगेवगळ्या गोष्टी करताना आपल्याला पाहालयला मिळतात. मराठी इंडस्ट्रीतही एख अभिनेत्री आहे ...
अभिनेत्री अभिनयासोबतच फिटनेसबाबतही अधिक जागरुक असताता. फिट राहण्यासाठी वेगेवगळ्या गोष्टी करताना आपल्याला पाहालयला मिळतात. मराठी इंडस्ट्रीतही एख अभिनेत्री आहे जी नित्यनियमाने योगा करते.आपलं सौंदर्य कायम राहवं आणि फिट दिसावं यासाठी माधवी निमकर कटाक्षाने काळजी घेत असते. वयाच्या 33 साव्या वर्षीही माधवी फिट आणि गॉर्जिअस दिसते.जीवनात आमूलाग्र असा बदल हवा असेन तर योगा करणे उत्तम असल्याचे माधवीला वाटते.गेल्या काही वर्षापासून माधवी नित्यनियमाने योगा करते आणि इतरांनाही योगा करण्याची सल्ला देते. योगासनं आणि शिरशासन करतानाचे तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर ती अपलोड करत असते. यागा करत असल्यामुळे मानसिक समाधान मिळत असल्याचेही माधवी सांगते. योगासनं आपल्या जीवनात आमूलाग्र बदल घडवत असल्याचे तिनं म्हटलं आहे. योगा विषयी अधिक माहिती देताना माधवी म्हणाली की,फिट राहण्यासाठी योगापेक्षा दुसरा चांगला पर्याय असूच शकत नाही. त्यामुळं मी पारंपरिक योगा करते. माझी प्रशिक्षक रिमा वेंगुर्लेकर मला योगा शिकवते. रोज सकाळी 10 ते 11 या आम्ही वेळेत योगाभ्यास करतो. तसंच आरोग्यदायी डाएटवर माझा भर असतो. डाएट म्हणजे कमी खाणं असं अनेकांचा गैरसमज आहे. मात्र तसं काही नसतं. मी आरोग्यला पोषक असं डाएट घेते म्हणजेच तेलकट पदार्थ खाणं टाळणं. मी भात खात नाही. जेवणात आवश्यकतेपेक्षा जास्त तूप घेत नाही आणि गोडही कमी खाते. सध्या मी स्विमिंग शिकतेय. अशारितीने योगाभ्यास, स्विमिंग, योग्य डाएट आणि व्यायाम यामुळं मी स्वतःला फिट आणि मेंटेन ठेवू शकते.