Join us

"कधीतरी शांत बसावं असं वाटतं...", केदार शिंदेंची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 17:05 IST

Kedar Shinde : केदार शिंदे सोशल मीडियावर सक्रीय असून नुकतीच सोशल मीडियावर शेअर केलेली त्यांची पोस्ट चर्चेत आली आहे.

केदार शिंदे (Kedar Shinde) हे मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते आणि दिग्दर्शक. केदार यांनी दिग्दर्शित केलेले अनेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर यशस्वी झालेत. गेल्याच वर्षी २०२३ ला आलेला 'बाईपण भारी देवा' सिनेमा चांगलाच यशस्वी झाला. 'सैराट'नंतर सर्वाधिक कमाई करणारा दुसरा सिनेमा म्हणून 'बाईपण भारी देवा' सिनेमाला ओळखलं जातंय. केदार शिंदे सोशल मीडियावर सक्रीय असून नुकतीच सोशल मीडियावर शेअर केलेली त्यांची पोस्ट चर्चेत आली आहे. केदार शिंदे यांनी सोशल मीडियावर स्वतःचा फोटो शेअर करत लिहिले की, कधीतरी शांत बसावं असं वाटत. आजूबाजूच्या गोंगाटात एकटं राहावं असं वाटतं. पण मग आठवण होते जबाबदाऱ्यांची! घरच्या बाहेरच्या सगळ्यांचीच. कितीही स्वतः ला सिध्द करा... अपुर्णतेचा आनंद वेगळाच असतो. काय केलंय आजपर्यंत त्यापेक्षा काय करू शकतो? याचा विचार अवर्णनीय असतो. रोजची सकाळ उगवते ती पुन्हा जन्म देण्यासाठी!! केदार शिंदे यांच्या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.

वर्कफ्रंट केदार शिंदे यांनी २०२३ मध्ये आलेला 'बाईपण भारी देवा' या सुपरहिट सिनेमाचे दिग्दर्शन केले. या सिनेमाचे सर्वच स्तरांवर कौतुक झाले. केवळ महिलांनीच नव्हे तर पुरुषांनीही हा सिनेमा पाहायला थिएटरमध्ये गर्दी केली. केदार शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी 'आईपण भारी देवा' या आगामी सिनेमाची घोषणा केली. २०२५ला हा सिनेमा रिलीज होणार आहे. केदार शिंदे सध्या कलर्स मराठी टिव्हीचे प्रोग्रामिंग हेड म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.

टॅग्स :केदार शिंदे