Join us

"टोमण्यांच्या भट्टीत तापलेला माणूस राख नाही तर…", रवींद्र महाजनींच्या निधनानंतर पहिल्यांदाच बोलली सूनबाई

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 9:46 AM

Ravindra Mahajani And Gashmeer Mahajani : रवींद्र महाजनी यांची सून गौरी हिने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. ती ट्रोलिंगवर मौन बाळगून होती.

अभिनेता गश्मीर महाजनी(Gashmeer Mahajani)चे वडील आणि मराठी चित्रपटसृष्टीतील हॅण्डसम हंक रवींद्र महाजनी (Ravindra Mahajanii) यांचे १४ जुलै रोजी निधन झाले. तळेगाव येथे त्यांचा मृतदेह बंद खोलीत आढळला होता. रवींद्र महाजनी त्यांच्या कुटुंबीयांपासून वेगळे एकटेच राहत होते. त्यांच्या निधनानंतर अनेकांनी गश्मीर आणि त्याच्या कुटुंबाला ट्रोल केले होते. अशातच ट्रोलर्सना उत्तर न देता त्याने शांत राहण्याचे काम केले. दरम्यान सासऱ्यांच्या निधनानंतर गश्मीरची पत्नी गौरी हिने सोशल मीडियावर गश्मीरचा फोटो शेअर करत पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

रवींद्र महाजनी यांची सून गौरी हिने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. ती ट्रोलिंगवर मौन बाळगून होती. रविंद्र महाजनी यांच्या अंत्यविधीला ती उपस्थित होती. तिने गुरुवारी सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे. ज्यात रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतरचे विधी पार पडत आहेत. त्यात गश्मीर पूजा करताना दिसत आहे आणि त्याच्या मागे रवींद्र महाजनी यांचा फोटो पाहायला मिळत आहे. गौरी हिने हा फोटो शेअर करत लिहिले की, टोमण्यांच्या भट्टीत तापवलेला माणूस राख नाही तर सोनं बनतो, अजूनही आणि कायमच, गर्व आहे मला तुझ्यासारख्या नवऱ्याची पत्नी असण्याचा. सध्या गौरीची ही पोस्ट व्हायरल झाली असून या पोस्टवर अनेक सकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहेत.

योग्य वेळ आली की सांगेन - गश्मीरगश्मीरने वडिलांच्या निधनानंतर ट्रोल करणाऱ्यांना इंस्टाग्राम स्टोरीवर प्रत्युत्तर दिले होते. तो म्हणाला होता की, एका कलाकाराला कलाप्रमाणे राहू द्या. मी आणि माझे सहकारी शांत राहू. जरी आम्ही शांत राहून मला / आम्हाला द्वेष आणि शिव्या देत असाल तरी आम्ही कोणत्याही गोष्टीपेक्षा त्याचे स्वागत करतो. देव दिवंगत आत्म्यास शांती देवो. ओम शांती. ते माझे वडील आणि माझ्या आईचे पती होते आणि आम्ही त्यांना तुमच्यापैकी कोणापेक्षाही चांगले ओळखतो. जेव्हा योग्य वेळ असेल तेव्हा मी याबद्दल सांगेन.

गश्मीरला केले होते ट्रोलगश्मीर महाजनी त्याच्या आई, पत्नी आणि मुलासोबत मुंबईत राहत होता आणि रवींद्र महाजनी एकटे तळेगावमधील आंबी गावात भाड्याच्या घरात राहत होते. त्यांचे निधन २-३ दिवसांपूर्वी झाले, हे घरातल्यांनाही माहित नव्हते. यावरुन लोकांनी अभिनेत्याला आणि त्याच्या कुटुंबियांना खूप ट्रोल केले होते. सोशल मीडियावर वडिलांसोबत एकही फोटो नसल्यामुळे त्यावरुनही त्याला ट्रोल केले गेले होते.

टॅग्स :गश्मिर महाजनीरवींद्र महाजनी