सोशल मीडियावर सोनाली कुलकर्णी नेहमीच अॅक्टिव्ह असते. ती आपल्या फॅन्ससोबत नेहमीच वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. नुकताच सोनालीने तिच्या होणा-या पतीसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. त्याचे हे फोटो पाहून मराठी इंडस्ट्रीतील सर्वात क्यूट कपल ठरतंय. सोशल मीडियावर दोघांच्या फोटोंना तुफान पसंती मिळत असून दोघांच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव सुरू आहे.
नेहमीप्रमाणेच फोटोत सोनाली ग्लॅमरस दिसत असून तिचा भावी पती कुणाल बेनोडेकर देखील डॅशिग अंदाजात पाहायला मिळतोय. गोवा बीचवर मस्त दोघेही फेरफटका मारत असल्याचे पाहायला मिळत आहे. या फोटोमध्ये हे कपल समुद्रसौंदर्य डोळ्यात साठवत असल्याचे पाहायला मिळत आहे. दोघांची जोडी परफेक्ट असून दोघं एकमेकांना समजून घेतात. रेशीमगाठीत अडकल्यानंतर त्याच्यातलं हे नातं लग्नानंतर अधिक घट्ट होईल मात्र हे दोघेही एकमेकांची तितकीच काळजी घेताना पाहायला मिळतात.
गेल्या काही महिन्यांपासून सोनाली ही दुबईमध्येच होती. या काळात कुणालसोबत किचनमध्ये वेगवेगळे पदार्थ बनवताना, किंवा दुबईतील स्थानिक हॉटेलमध्ये भेट देतानाचे अनेक व्हिडीओ सोनाली सोशल मीडियावर शेअर करत होती. मात्र आता ती मुंबईत परतली असून तिच्यासोबत कुणालही इथे आला आहे. सोनाली आणि कुणाल अभिनेत्री सई ताम्हणकरला भेटवले. त्यांनी तिघांचा एकत्र फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत लिहिले की, जेव्हा दाजी येतात घरी.
कुणाल दुबईमध्ये राहतो सोनालीने 2 फेब्रुवारी रोजी साखरपुडा केला होता. याबाबत आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने सोनालीने स्वतः फॅन्ससोबत ही आनंदाची बातमी शेअर केली होती. तिने आपल्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले होते.
या फोटोंवरही तुफान शुभेच्छांचा वर्षाव झाला होता. तुर्तास साखरपुडा झाला असला तरी लग्नाची तारिख अजुन समोर आलेली नाही. तसेच प्रार्थना बेहेरेलादेखील सोनाली आणि कुणाल भेटले. त्यांचा सेल्फी फोटो त्यांनी इंस्टाग्रामवर शेअर केला आणि म्हटले की अखेर आम्ही भेटलो आणि आता लग्नाची वाट पाहतोय.