Join us

प्रेमाची कबुली दिल्यानंतर परदेशात व्हॅकेशन एन्जॉय करतेय ही मराठी अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 3:04 PM

कुणाल बेनोडेकर सोबत लग्नाच्या बेडीत ती अडकणार आहे.

काही दिवसांपूर्वीच एका मुलाखती दरम्यान या मराठी अभिनेत्रींने रिलेशनशीपमध्ये असल्याचा खुलासा केला. आम्ही बोलतोय, सोनाली कुलकर्णीबदल.सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. आपल्या खासगी आणि आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते. ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातूनच सोनालीने रिलेशनशीपचे संकेत दिले होते.  सध्या सोनाली दुबईमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय. दुबईतल्या वाळवंटामधले फोटो सोनालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.  

सोनाली कुलकर्णीने आज तिच्या मेहनतीने मराठी चित्रपटसृष्टीत तिचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिने बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. तिने मराठीत एकाहून एक हिट चित्रपट दिले असून हिंदी चित्रपटातही तिने काम केले आहे.  

सोनालीच्या करिअरबाबत बोलायचे झाले तर तिने अंजिठा, पोस्टर गर्ल, झपाटलेला २, मितवा, क्लासमेट यांसारख्या चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. बकुळा नामदेव घोटाळे या तिच्या पहिल्या चित्रपटासाठी तिला अनेक पुरस्कार देखील मिळाले होते.

सोनालीच्या पर्सनल आयुष्याबाबत बोलायचे झाले तर कुणाल बेनोडेकर सोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. कुणाल हा मूळचा लंडनचा आहे. कुणाल हा चार्टर्ड अकाउंटेंट असून दुबईत सिनीयर एडजस्टर म्हणून काम करतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोनाली लवकरच कुणालसोबत लग्नबेडीत अडकणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच लग्नानंतर सोनाली दुबईत स्थायिक होणार असल्याचंही बोललं जातंय.

टॅग्स :सोनाली कुलकर्णी