Join us

दुसऱ्या लग्नानंतर सासरी गेलेल्या सोनाली कुलकर्णीची नवीन पोस्ट चर्चेत, म्हणाली- 'मंगळसूत्राच्या उलट्या वाट्या..'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 12:50 PM

Sonalee Kulkarni : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या लंडनमध्ये आहे. तिथली शेअर केलेली तिची पोस्ट चर्चेत आली आहे.

मराठी सिनेइंडस्ट्रीतील अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) सध्या लंडनमध्ये आहे. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसादिवशी ७ मे रोजी सोनाली आणि तिचा नवरा कुणाल बेनोडेकरसोबत पुन्हा विधीवत लग्नबंधनात अडकली. त्यानंतर ती हनीमूनसाठी मेक्सिकोला गेली होती. तिथले फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हनीमूनमधील तिचा बिकनीतील बोल्ड लूक खूप चर्चेत आला होता. त्यानंतर आता तिने सोशल मीडियावर शेअर केलेली लेटेस्ट पोस्ट चर्चेत आली आहे. यात तिने सासरी पहिल्यांदाच पदार्थ बनवला आहे. त्याचा फोटो शेअर करत तिने हटके अंदाजात उखाणादेखील घेतला आहे.

सोनाली कुलकर्णीने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. त्यात पाहायला मिळत आहे की, तिच्या हातात ट्रे असून त्यात खीरीने भरलेल्या वाट्या दिसत आहेत. यावेळी अभिनेत्रीने राखाडी रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. तिने हा फोटो शेअर करत लिहिले की, सासरी केलेला पहिला पदार्थ : तांदळाची खीर. उखाणा “लग्नविधीं नंतर घातलेल्या मंगळसूत्राच्या उलट्या वाट्या कुणालच्या घरच्यांसाठी आणल्या तांदळाच्या खीरीने भरलेल्या वाट्या.” 

सोनाली आणि कुणाल मागील वर्षीच ७ मे, २०२१ रोजी दुबईतील एका मंदिरात लग्नबंधनात अडकले होते. या लग्नाला दोघांचेही आई-वडील उपस्थित नव्हते. त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून दोघांना आशीर्वाद दिले होते. कोरोनाच्या संकटामुळे साध्या पद्धतीनेच लग्न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. त्यानंतर या वर्षी लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला त्यांनी पुन्हा एकदा लग्न केले. हा लग्नसोहळा लंडन येथे काही मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत पार पडला. या लग्नाला तिची मैत्रीण अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिनेदेखील हजेरी लावली होती. 

टॅग्स :सोनाली कुलकर्णी