Join us

सोनालीचा ‘सेगा’ डान्स होतोय व्हायरल, तुम्ही पाहिलात का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 12:31 IST

मराठमोळी अभिनेत्री आणि रसिकांची लाडकी 'अप्सरा' म्हणजेच सोनाली कुलकर्णी.विविध सिनेमात सोनालीनं भूमिका साकारत रसिकांची मनं जिंकली आहेत

मराठमोळी अभिनेत्री आणि रसिकांची लाडकी 'अप्सरा' म्हणजेच सोनाली कुलकर्णी.विविध सिनेमात सोनालीनं भूमिका साकारत रसिकांची मनं जिंकली आहेत. सोनाली कुलकर्णी नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यामातून तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते. तिच्या चित्रपटाचे चित्रीकरण कुठे सुरू आहे, ती चित्रीकरणातून वेळ काढून कुठे व्हेकेशनला गेली आहे या प्रत्येक गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या फॅन्सना सांगत असते. त्यामुळे तिला मोठ्या संख्येने तिचे चाहते मोठ्या प्रमाणावर फॉलो करतात.

सध्या सोनाली मॉरिशसमध्ये फिरताना दिसतेय. नुकताच सोनालीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सोनाली डान्स करताना दिसतेय. मॉरीशसमध्ये 'सेगा' डान्स या व्हि़डीओत सोनाली करताना दिसतेय. सोनालीच्या हा व्डिडीओ तिच्या फॅन्सना आवडला आहे.      

सोनाली कुलकर्णीने आज तिच्या मेहनतीने मराठी चित्रपटसृष्टीत तिचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिने बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. तिने मराठीत एकाहून एक हिट चित्रपट दिले असून हिंदी चित्रपटातही तिने काम केले आहे. नटरंग या चित्रपटातील अप्सरा आली हे तिचे गाणे प्रचंड गाजले होते.

या चित्रपटानंतर तिला मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सराच म्हटले जाते. तिने अंजिठा, पोस्टर गर्ल, झपाटलेला २, मितवा, क्लासमेट यांसारख्या चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. बकुळा नामदेव घोटाळे या तिच्या पहिल्या चित्रपटासाठी तिला अनेक पुरस्कार देखील मिळाले होते. 

टॅग्स :सोनाली कुलकर्णी