सोनाली कुलकर्णी आज मराठी चित्रपटसृष्टीत आपले एक वेगळे अस्तित्वच निर्माण केले आहे. सोनाली कुलकर्णीने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. सोनाली तिच्या सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यामतून ती आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिने नुकताच तिच्या होणाऱ्या पतीच्या कुटुंबासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
सोनालीने कुणालच्या कुटुंबियांसोबतचा एक फोटो शेअर केला असून हा फोटो काही महिन्यांपूर्वी काढलेला आहे. या फोटोसोबत तिने लिहिले आहे की, माझ्या फॅमिली आणि होणाऱ्या फॅमिली सोबत अशी एकत्र केलेली पहिलीच फॉरेन ट्रीप! आमच्या साखरपुड्यानंतर एकमेकांना जाणून घेण्यासाठी छान वेळ घालवण्यासाठी माझे आणि कुणालचे आई बाबा, भाऊ आम्ही सगळेच आठवडाभर दुबईत एकत्र राहिलो. आपली फॅमिली ही आपले मित्र होऊ शकतात आणि खरी नात्यातली मजा तेव्हाच सुरू होते हे जाणवलं.
गेल्या वर्षी सोनाली आणि कुणाल बेनोडेकरचा साखरपुडा झाला आहे. यावर्षी सोनाली कुणालसोबत लग्न बंधनात अडकणार असल्याचे बोलले जातेय. सोनाली कुलकर्णीने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. कोणत्याही भूमिकेला न्याय देण्याचे कसब सोनालीकडे आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. तिने मराठीत एकाहून एक हिट चित्रपट दिले असून हिंदी चित्रपटातही तिने काम केले आहे. लवकरच तिचा झिम्मा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.