मराठी सिनेसृष्टीची अप्सरा अर्थात सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni ) हिच्या लंडनमधील शाही लग्नसोहळा अखेर चाहत्यांना याचि डोळा, याचि देही अनुभवला आला. होय, काल रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सोनाली व तिचा पती कुणाल यांच्या वेडिंग स्टोरीचे तिनही भाग प्रदर्शित झालेत.
तुम्हाला ठाऊक आहेच, सोनाली व कुणाल यांनी 2021 मध्ये लॉकडाऊनच्सा काळात दुबईत रजिस्टर मॅरेज केलं होतं. ते सुद्धा अगदी साध्या पद्धतीने. या लग्नात अगदी सोनालीचे कुटुंबीय सामील होऊ शकले नव्हते. शिवाय लग्नाची हौसमौजही करता आली नव्हती. त्यामुळे यावर्षी लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला सोनाली व कुणाल यांनी लंडनमध्ये पुन्हा एकदा विधिवत शाही लग्न केलं. मात्र या लग्नाचा एकही फोटो, व्हिडीओ सोनालीने शेअर केला नव्हता. आपल्या लाडक्या अभिनेत्रीच्या लग्नाचे फोटो, व्हिडीओ चाहत्यांना उत्सुकता होती.
अखेर प्लॅनेट मराठीने चाहत्यांची ही इच्छा पूर्ण केली. सोनाली व कुणालच्या लंडनमधील लग्न सोहळ्याची मालिका प्लॅनेट मराठीवर प्रदर्शित करण्यात आली. या लग्न मालिकेदरम्यान सोनालीनं तिची व कुणालची पहिली भेट, त्याचं प्रपोज करणं असे सगळे धम्माल किस्सेही सांगितले.तिच्या प्रपोजचा किस्सा चांगलाच मजेशीर आहे. तो सुद्धा तिने शेअर केला.
भेट अन् प्रपोजसोनालीने सांगितलं, ‘2017 मध्ये काही कॉमन फ्रेन्डच्या माध्यमातून माझी व कुणालची भेट झाली होती. आम्ही पहिल्यांदा आॅनलाईन भेटलो. चॅट करता करता आमची मस्त मैत्री झाली आणि मग आम्ही पहिल्यांदा लंडनला भेटलो. मग तो दुबईमध्ये शिफ्ट झाला. आमच्या भेटी वाढल्या. आम्ही प्रेमात पडलो होतो. पण गाडी पुढे सरकेचना. दोन वर्ष झालीत. अखेर 2 वर्षानंतर मी त्याला अक्षरश: धमकीच दिली. या भेटीनंतर जर का तू पुढे काही आॅफिशियल केलं नाही तर माझे आई-वडील मला तुला भेटायला पाठवायचे नाहीत, असं मी त्याला बजावलं. ती आमच्या भेटीची शेवटची संध्याकाळ होती. तो मला दुबईच्या सगळ्यात उंच ठिकाणी घेऊन गेला आणि आम्ही एक झीप लाइन रोलर कोस्टर राइड केली. सूर्यास्ताची वेळ होती आणि अशा सुंदर संध्याकाळी तो मला प्रोपज करणार, असं मला वाटू लागलं होतं. मी प्रचंड उत्सुक होते.पण त्यावेळी तसं काहीच घडलं नाही.
दुसऱ्यादिवशी माझी फ्लाइट होती. सकाळी मी त्याच्याकडे रुक्ष नजरेनं पाहिलं आणि त्याला मला एअरपोर्टला सोडायला सांगितलं. मी लिफ्टपाशी उभी होते. अचानक कुणालने मला हाक मारली आणि तू काही विसरत तर नाहीयेस ना? असं म्हणत ओव्हरअॅक्टिंग सुरू केली. त्याने मला पुन्हा आता बोलावलं. त्याने माझ्या आवडीचं गाणं लावलं आणि मला त्यावेळी तिथेच प्रपोज केलं. तू हे काल का नाही केलं? असा यावरचा माझा प्रश्न होता. त्यावरचं त्याचं उत्तर ऐकून मला हसू आवरेना. मी कालच तुला प्रपोज करणार होतो. पण मी त्यावेळी अंगठी विसरलो होतो..., असं तो अगदी निष्पाप चेहºयानं म्हणाला. ते ऐकून मला हसू आवरेना...’