Join us

"तोबा-तोबा" गाण्यावर थिरकली अप्सरा, सोनाली कुलकर्णीचे डान्स मुव्हस पाहून विकी कौशलाही विसरुन जाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2024 14:19 IST

विकी कौशलच्या "तोबा-तोबा" गाण्याची अप्सरेला भुरळ, केला भन्नाट डान्स

सोशल मीडियावर अनेक गाणी ट्रेंड होताना दिसतात. दिवसागणिक या गाण्यांचा ट्रेंड बदलत जातो. सध्या सोशल मीडियावर विकी कौशलच्या 'तौबा तौबा' गाण्याची चर्चा आहे. या गाण्याने इन्फ्लुएन्सरपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांना वेड लावलं आहे. अनेक जण या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. विकी कौशलच्या या गाण्याची मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीलाही भुरळ पडली आहे. सोनालीने विकीच्या या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. 

मराठी सिनेसृष्टीची अप्सरा म्हणून ओळख मिळवणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सौंदर्य आणि नखरेल अदांनी चाहत्यांना घायाळ करत असते. अभिनेत्री असण्याबरोबरच सोनाली उत्तम डान्सरदेखील आहे. सोशल मीडियावरही ती प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा सोनाली ट्रेंडही फॉलो करताना दिसते. काही दिवसांपूर्वी तिने 'अंगारो सा' गाण्यावर हटके डान्स केला होता. आता सोनालीने विकी कौशलच्या 'तौबा तौबा' गाण्यावर व्हिडिओ बनवत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

सोनालीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन 'तौबा तौबा' गाण्यावरील डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती या गाण्याच्या हुक स्टेप्स करताना दिसत आहे. तिचे डान्सिंग मुव्हस पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. सोनालीच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. चाहत्यांनी सोनालीचं कौतुक केलं आहे. 

दरम्यान, 'तौबा तौबा' हे विकी कौशलच्या आगामी 'बॅड न्यूज' या सिनेमातील गाणं आहे. प्रदर्शित होताच हे गाणं सोशल मीडियावर ट्रेंड झालं. या गाण्यातील विकीच्या डान्सचं प्रचंड कौतुकही होत आहे. विकी कौशलच्या या सिनेमात त्याच्याबरोबर अभिनेत्री तृप्ती डिमरी आणि अमी विर्क मुख्य भूमिकेत आहेत. येत्या १९ जुलैला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :सोनाली कुलकर्णीविकी कौशलसेलिब्रिटी