Join us  

वडिलांसारखं सांभाळत त्यांनी..., रमेश देव यांच्या निधनानंतर सोनाली कुलकर्णी भावुक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2022 4:13 PM

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने रमेश देव यांच्या निधनानंतर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आपला ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते रमेश देव (Ramesh Deo) यांचे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. बुधवारी 2 फेब्रुवारी 2022 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी रमेश देव यांच्या आठवणींना उजाळा दिला. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) हिने रमेश देव यांच्या निधनानंतर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. अगदी वडिलांसारखं सांभाळत त्यांनी माझ्याकडून काम करून घेतलं, असं तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

 

वाचा, सोनालीची पोस्ट तिच्याच शब्दांत...

रमेश देव ….त्यांनी दिग्दर्शत केलेल्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली म्हणून त्यांना अगदी जवळून पाहता आलं..अगदीच २० एक वर्षांची मी. रमेश काका, सर…काय म्हणावं कळत नव्हतं, त्यांचं stardom, aura, अनुभव, दरारा… पाहून intimidate झाले होते…पण अगदी वडिलांसारखं सांभाळत त्यांना माझ्या कडून काम करून घेतलं. त्यांचा उत्साह, काम करण्याची जिद्द, इतकी वर्षं इतकी कमालीची कामं करूनही ज़रा ही कमी झालेला नव्हता.In fact, set वर त्यांची energy कधी ही कुणी ही match करू शकायचा नाही. एखादा चांगला shot बघून अगदी लहान मुळांसारखे excited व्हायचे...अगदी इतक्यातंच..  पुरस्कार सोहळ्यात त्यांना भेटले होते…तेव्हाही तेतकेच उत्साही वाटले…आज ते आपल्यात नाही… अविश्वसनीय !भावपूर्ण श्रद्धांजली

रमेश देव यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये नायक, खलनायक अशा दोन्ही भूमिका साकारल्या. 1951 साली त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.  1956 साली राजा परांजपे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आंधळा मागतो एक डोळा’ या सिनेमातून त्यांनी अभिनेता म्हणून खºया अर्थाने आपल्या कारकिदीर्ला सुरुवात केली होती. यानंतर 285   हिंदी सिनेमे, 190 मराठी सिनेमे, 30 नाटकं, 200 प्रयोग आणि 250 जाहिरातीत त्यांनी भूमिका साकारल्या.

टॅग्स :रमेश देवसोनाली कुलकर्णी