Join us  

"सुपरहिट का ‘राज’ है”, ‘बाईपण भारी देवा’ आणि राज ठाकरेंबरोबरचा फोटो शेअर करत सोनालीची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 11:58 AM

'बाईपण भारी देवा'टी टीम आणि राज ठाकरेंबरोबरचा फोटो शेअर करत सोनालीची पोस्ट, म्हणाली...

सोनाली कुलकर्णी ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अभिनयाच्या जोरावर तिने मराठीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीही गाजवली. अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात काम करुन सोनालीने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. सोनालीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नुकतंच सोनालीने शेअर केलेल्या एका पोस्टची चर्चा रंगली आहे.

सोनालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये 'बाईपण भारी देवा' चित्रपटाची टीम आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंबरोबरचा एका कार्यक्रमातील फोटो सोनालीने शेअर केला आहे. सध्या 'बाईपण भारी देवा' चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला पाहायला मिळत आहे. सोनालीने या पोस्टमधून चित्रपटाचं कौतुक करत फोटोला साजेसं कॅप्शन दिलं आहे. या फोटोला तिने ‘सुपरहिट का राज है’ असं कॅप्शन दिलं आहे. तिच्या या पोस्टने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.

“राजकारण्याच्या मुलाबरोबर मी रिलेशनशिपमध्ये होते”, शर्लिन चोप्राचा खुलासा, म्हणाली, “तो सेक्ससाठी...”

सोनालीने चित्रपटांबरोबरच वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. मे महिन्यात प्रदर्शित झालेल्या 'क्रॅकडाऊन २' या वेब सीरिजमध्ये ती दिसली होती. 'डॉ. प्रकाश बाबा आमटे', 'अगं बाई अरेच्चा २', 'कच्चा लिंबू', 'गुलाबजाम' या चित्रपटांतील तिच्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. तर 'सिंघम', 'दिल चाहता है' या हिंदी चित्रपटांतून सोनालीने अभिनयाचा ठसा उमटवला होता.

टॅग्स :सोनाली कुलकर्णीराज ठाकरेकेदार शिंदे