Join us

​सोनाली शाहरुखची जबरा फॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2016 5:23 PM

बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानची एक झलक पाहण्यासाठी लोक अक्षरश: वेडे असतात. अहो, सर्वसामान्य पे्रक्षकच नाही तर अनेक कलाकारांना देखील ...

बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानची एक झलक पाहण्यासाठी लोक अक्षरश: वेडे असतात. अहो, सर्वसामान्य पे्रक्षकच नाही तर अनेक कलाकारांना देखील शाहरुख सोबत काम करण्याची इच्छा असते. बºयाच अभिनेत्री शाहरुखच्या चाहत्या देखील आहेत. आता आपली मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिची देखील शाहरुखच्या फॅन लिस्टमध्ये वर्णी लागली आहे असे म्हणायला काही हरकत नाही. सोनाली शाहरुखची जबरदस्त चाहती असल्याचे नुकतेच समजले आहे. बरं, असे आम्ही सांगत नाही तर स्वत: सोनालीने या गोष्टीचा खुलासा केला आहे. सोशल साईट्सवर शाहरुखसोबतचा एक फोटो अपलोड करुन मी तुझी फॅन आहे असे सोनालीने जगजाहीर सांगितले  आहे. शाहरुख आणि आलियाच्या डिअर जिंदगी या चित्रपटाचा प्रिमिअर शो नुकताच आयोजित करण्यात आला होता. या शोसाठी काही खास कलाकारांना आमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये सोनालीचा देखील समावेश होता. सोनालीने हा चित्रपट पाहिला आणि तिला तो प्रचंड आवडला. या चित्रपटामध्ये शाहरुखने चांगले काम केल्याचेही ती सांगत आहे. या चित्रपटाच्या प्रिमिअरवेळीच ती किंग खानला भेटली. मग आपल्या आवडत्या व्यक्तीला भेटल्यावर फोटो काढण्याचा मोह सोनालीला झाला नसता तर नवलच म्हणावे लागले असते. शाहरुखला भेटल्यावर तो क्षण कायम कॅमेºयात बंदिस्त करण्याची संधी सोनालीने सोडली नाही. बरं, हा या दोघांचा पहिलाच फोटो असल्याचे देखील सोनालीने सांगितले आहे. त्यामुळे शाहरुख-सोनालीचा हा फोटो एकदमच खास आणि अविस्मरणीय आहे. सोनालीने बॉलिवूडमध्ये देखील तिच्या अभिनयाची छाप उमटविलीच आहे. अनेक दर्जेदार चित्रपटांमध्ये तिने महत्वपूर्ण भूमिका बजावल्या आहेत. त्यामुळे आपल्याला लवकरच सोनाली आणि शाहरुखची जोडी मोठ्या पडदयावर पाहायला मिळाली तर आश्चर्य वाटायला नको.