Join us  

सोनालीचा रेड हॉट अंदाज, ‘अप्सरा’चा हा लूक पाहून तुम्हीही व्हाल फिदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 1:32 PM

समुद्र किनाऱ्यावर झालेल्या या फोटोशूटमध्ये सोनालीचं सौंदर्य आणि अद्भुत निसर्गाचा नजारा असा मिलाफ पाहायला मिळत आहे.तेजस नेरुरकरने सोनालीचे हे फोटोशूट केले असून विनोद सरोदेने तिचा मेकअप केला आहे.

मराठमोळी अभिनेत्री आणि रसिकांची लाडकी 'अप्सरा' म्हणजेच सोनाली कुलकर्णी.विविध सिनेमात सोनालीनं भूमिका साकारत रसिकांची मनं जिंकली आहेत. मात्र सध्या सोनालीच्या सिनेमाची चर्चा नसली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती रसिकांशी संवाद साधत असते. यानिमित्ताने आपल्या लाडक्या ‘अप्सरा’शी मनमोकळ्या गप्पा मारण्याची संधी रसिकांना मिळते. इतकंच नाही तर सोनाली सोशल मीडियावर तिचे फोटोसुद्धा आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. नुकतंच सोनालीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सोनालीचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळत आहे. लाल रंगाच्या ड्रेसिंगमध्ये सोनालीचा हॉट आणि तितकाच सेक्सी अंदाज दिसून येत आहे. सोनालीच्या या अदा कुणालाही घायाळ करतील अशाच आहेत. समुद्र किनाऱ्यावर झालेल्या या फोटोशूटमध्ये सोनालीचं सौंदर्य आणि अद्भुत निसर्गाचा नजारा असा मिलाफ पाहायला मिळत आहे.तेजस नेरुरकरने सोनालीचे हे फोटोशूट केले असून विनोद सरोदेने तिचा मेकअप केला आहे. दुबईत हे फोटोशूट करण्यात आल्याचं समजतंय. या फोटोला सोनालीने एक कॅप्शनही दिले आहे. फिनिक्स पक्षाने पुन्हा उभारी घ्यायलाच हवी असं कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे. सोनालीच्या या फोटोला तिच्या फॅन्सकडून बरेच लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत. याआधीसुद्धा सोनालीने तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या नववधूच्या अंदाजातील फोटोसुद्धा काही दिवसांपूर्वी रसिकांसाठी चर्चेचा विषय ठरला होता. सोनालीचा हा नववधू किंवा ब्रायडल लूक पाहून रसिकांध्ये तिच्या लग्नाची कुजबूज सुरु झाली होती.

मराठी चित्रपटसृष्टीत अनेक कलाकारांची लग्न गेल्या काही महिन्यांत झालीत. त्यामुळे आपल्यालाही लग्न कधी करणार अशी विचारणा होऊ लागल्याची प्रांजळ कबुली तिने दिली आहे. आपला विवाह संस्थेवरविश्वास असून मित्र मैत्रिणींकडे पाहून आपल्याला लग्न करावंसं वाटतं असं सोनालीने सांगितले आहे. मात्र हे लग्न जगावेगळे म्हणजे किमान विराट-अनुष्काच्या लग्नाप्रमाणे राजा राणीसारखं असावं असं सोनालीला वाटतंय.एखादा चांगला मुलगा कुणी आयुष्यात आला तर लग्न करु असंही तिने सांगितले आहे.  

टॅग्स :सोनाली कुलकर्णी