Join us

‘आषाढी एकादशी’च्या निमित्ताने ‘पांडुरंग’ गाणे आले भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 5:59 PM

आषाढी एकादशीचं औचित्य साधून ‘पांडुरंग’ हे भक्ती गीत नुकतेच प्रदर्शित झाले आहे.

पांडुरंग आणि त्याची पंढरी ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी हक्काचं माहेर आहे यात काही शंका नाही. पंढरपूरचा विठोबा हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असल्यामुळे ‘आषाढी एकादशी’ला अनन्य साधारण महत्त्व आहे. आषाढी एकादशी म्हटले की प्रथम डोळ्यांसमोर येते ती विठू माऊलीच्या नामस्मरणात तल्लीन होणारी पंढरपूरची वारी. विठू माऊलीच्या नामाने आणि आषाढी एकादशीचं औचित्य साधून ‘कडक भक्ती’ चॅनेलवरील पहिलं वहिलं भक्ती गीत ‘पांडुरंग’ नुकतेच प्रदर्शित झाले आहे.

वेगवेगळे विषय प्रादेशिक भाषेत मांडून आणि वेगवेगळ्या जॉनरच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करायचे असे ‘कडक मराठी’च्या नरेंद्र फिरोदिया, श्रुती मुनोत आणि मयुरी मोरे- मुनोत यांनी ठरवले आणि तिच नवीन वाटचाल आज आषाढी एकदशीच्या निमित्ताने सुरु होतेय आणि ती नवी वाटचाल म्हणजे भक्तीपर विशेष कार्यक्रमासाठी असलेलं त्यांचं स्वत:चं असं स्वतंत्र व्यासपीठ ‘कडक भक्ती’. 

कडक एंटरटेनमेंट’ आणि ‘कोल्हापूर फिल्म कंपनी’ निर्मित ‘पांडुरंग’ या भक्ती गीताची संकल्पना मनोरंजनसृष्टीतील स्वप्नील संजय मुनोत, अक्षय मुनोत आणि ‘पोश्टर बॉय’ उर्फ सचिन सुरेश गुरव यांची आहे. हे भक्तीगीत गीतकार गुरु ठाकूर यांनी रचले आहे. या भक्ती गीताला विजय नारायण गवंडे यांनी संगीत दिले आहे तर कृष्णा बोंगाणे यांनी ते गायले आहे. छायाचित्रणाची जबाबदारी प्रथमेश रांगोळे यांनी उत्तमरित्या पेलली आहे तर संकलन वैभव पाटील आणि डिझाईन्स सचिन सुरेश गुरव यांनी केले आहे. या भक्तीगीताच्या निमित्ताने सचिन सुरेश गुरव यांनी निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे.

टॅग्स :आषाढी एकादशी