Join us

'सोनपरी' मृणाल कुलकर्णी यांची पतीसाठी खास पोस्ट, म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 19:19 IST

मराठी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मोठा चाहतावर्ग आहे.

Mrinal Kulkarni: आपल्या अभिनयासोबतच आपल्या सौंदर्याने चाहत्यांना भुरळ घालणाऱ्या मृणाल यांनी सोनपरी बनून चिमुकल्यांच्या जगातही स्थान मिळवलं. त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपट व मालिकांमध्ये काम केलं. विशेष म्हणजे अल्पावधीत लोकप्रियता मिळवणाऱ्या मृणालची लव्हस्टोरीही भन्नाट आहे. मृणाल जेव्हा ११वी मध्ये होत्या, तेव्हाच त्या रुचिर यांच्या प्रेमात पडल्या होत्या. १९९०मध्ये दोघांनी लग्न केलं होतं आणि आजही त्यांचा सुखाचा संसार सुरू आहे. 

मृणाल यांचं पती रुचिरवर प्रचंड प्रेम आहे. आज रुचिर यांच्या वाढदिवसानिमित्त मृणाल यांनी खास पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी लिहलं, "आमचं कुटुंब एकमेकांशी घट्ट जोडलेलं आणि रुचिर त्याचा एक अविभाज्य भाग. अगदी फार फार वर्षापासून किस्से सांगून आम्हा सर्वांना खळाळून हसवणारा, धमाल, खोड्या करणारा, आरडाओरडा करुन हक्कानी कौतुक वसूल करणारा, अतिशय मनापासून दाद देणारा आणि क्षणात गंभीर होऊन अगदी योग्य असा सल्ला देणारा. आईच्या आजारपणात थोरला बनून त्याने आम्हा सर्वांना आधार दिला. तेव्हा त्याचं एक वेगळंच रूप जाणवलं. अनेक वर्षे एकत्र असलो तरी आपण एकमेकांना सतत नव्याने उमगत असतो हेच खरं. रूचिर, तू असा हात घट्ट धरला आहेस हे फार फार सुखाचं आहे. तुला जन्मदिनाच्या अनेकानेक शुभेच्छा".

मृणाल यांचे पती रुचिर हे पेशाने वकील आहेत. तर मुलगा विराजस आणि सून शिवानी रांगोळे मालिका व सिनेविश्वात सक्रिय आहे. मृणाल यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्या अलिकडेच 'गुलाबी' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या. मृणाल यांनी  आजवरच्या करिअरमध्ये त्यांनी अनेक पौराणिक आणि ऐतिहासिक भूमिकाही साकारल्या.  त्यांनी मराठीसह बॉलिवूड सिनेमांमध्येही काम केलं. इतकंच नाही तर अभिनय क्षेत्रात नशीब आजमावल्यानंतर त्यांनी त्यांचा मोर्चा दिग्दर्शनाकडे वळवला. 

टॅग्स :मृणाल कुलकर्णीमराठी अभिनेतासेलिब्रिटी