Join us

या मराठी सिनेमात सोनू सूद झळकणार मुख्य भूमिकेत,लवकरच सिनेमाच्या शूटिंगला होणार सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2018 6:34 AM

भारतात कलाकार आणि क्रिकेटर्सवर रसिक जीवापाड प्रेम करतात.बॉलिवूडच्या कलाकारांची एक झलक पाहायला मिळावी यासाठी रसिक वाट्टेल ते करायला तयार ...

भारतात कलाकार आणि क्रिकेटर्सवर रसिक जीवापाड प्रेम करतात.बॉलिवूडच्या कलाकारांची एक झलक पाहायला मिळावी यासाठी रसिक वाट्टेल ते करायला तयार असतात. कलाकारांची रसिकांमध्ये अशी काही क्रेझ पाहायला मिळते की रसिक त्यांची देवाप्रमाणे पूजा करतात.कुठे कलाकारांची मूर्ती उभारुन तर कुठे मंदिरं उभारण्यात आली आहेत. काही रसिक आपल्या मुलांची नावंसुद्धा आपल्या लाडक्या कलाकारांच्या नावावरुनच ठेवतात.सर्वसामान्य रसिकांसह बड्या निर्मात्यांनाही कलाकारांच्या नावाची भुरळ पडल्याचे पाहायला मिळाले आहे.त्यामुळे कलाकारांच्या नावाचा वापर करुन सिनेमाला शीर्षक देण्यात आल्याचे पाहायला मिळाले आहे.यांत आणखी एका अशाच सिनेमाची भर पडली आहे. 'सलमान सोसायटी' असं या सिनेमाचं नाव आहे.या सिनेमाचा सलमान खानशी काहीही संबंध नाही.तरीही सलमानचं नाव देऊन रसिकांना सिनेमागृहाकडे आकर्षित करण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.लेखक आणि दिग्दर्शक कैलाश काशीनाथ पवार यांच्या ​या पहिल्या मराठी सिनेमाचा मुहूर्त अभिनेता सोनू सूदच्या उपस्थितीत पार पडला.'पढेगा इंडिया ​तो बढेगा इंडिया' अशी टॅगलाइन असलेला हा सिनेमा बाल शिक्षणासारख्या विषयावर भाष्य करणारा असणार आहे.या सिनेमात रसिकांना कॉमेडीचा तडकाही अनुभवायला मिळणार आहे.या सिनेमाच्या पहिल्या शेड्युअलचं शूटिंग मार्चच्या दुस-या किंवा तिस-या आठवड्यात सुरु होण्याची शक्यता आहे.चंद्रकांत पवार आणि रेखा सुरेंद्र जगताप यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.सिनेमाच्या स्टारकास्टची नावं अजूनही गुलदस्त्यातच आहेत.सोनू सूदला मराठी सिनेमावर विशेष प्रेम आहे.त्याने याबाबत कायम जाहीर कबुली दिली आहे.त्यामुळे मुहूर्ताला येण्याबाबत विचारलं असता त्यानं क्षणाचाही विलंब न लावता होकार दिला.आता सोनू सूद या सिनेमात एखादी भूमिका साकारणार का याची उत्सुकता आहे.मराठी सिनेसृष्टीत विविध विषयांवील दर्जेदार सिनेमांची निर्मिती होत आहे.प्रत्येक सिनेमाचा विषय आणि कथा हटके असते.मराठी सिनेमाची कथा आणि विषय बॉलिवूडलाही भुरळ घालत आहे.मराठी सिनेमांची किर्ती थेट ऑस्करपर्यंत पोहचली आहे.आता मराठीत अशाच एका वेगळ्या विषयावर एक वेगळा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे.