Join us

साऊथ अभिनेत्री जिया शंकरचं रितेश-जेनिलियाच्या 'वेड'मधून मराठी कलाविश्वात पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 18:01 IST

Jiya Shankar : अभिनेत्री जिया शंकर लवकरच वेड या मराठी चित्रपटात दिसणार आहे.

अभिनेत्री जिया शंकर (Jiya Shankar) लवकरच 'वेड' (Ved Movie) या मराठी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातून रितेश देशमुखने दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. साउथ सिनेसृष्टीती ती लोकप्रिय अभिनेत्री आहे. या चित्रपटात जेनेलिया देशमुख प्रमुख भूमिकेत दिसणार आहे आणि ३० डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

जिया शंकर हिने एका मुलाखतीत वेड चित्रपटाबद्दल सांगितले की, वेड म्हणजे वेडेपणा. ही त्रिकुटाची प्रेमकथा अजिबात नाही. या दोन भिन्न प्रेमकथा आहेत आणि प्रेम पूर्णपणे भिन्न आहे. रितेश दुहेरी भूमिका करत नाही. मी रितेशच्या विरुद्ध भूमिकेत आहे आणि जेनेलियाही त्याच्या विरुद्ध आहे. कथा खूप वेगळी आहे म्हणून मी तुम्हाला त्याबद्दल आता काहीही सांगू शकत नाही.

मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल तिने सांगितले की, हे आश्चर्यकारक होते. असे होईल अशी मी कधीच अपेक्षा केली नव्हती. माझ्या नशिबात लिहिलं होतं असं वाटतं. मला मराठीत काम करायचे होते. कास्टिंग डायरेक्टरकडून एक दिवस मला कॉल आला. तो रितेश देशमुख होता, मी नाही कसे म्हणू शकते? कोणत्याही ऑडिशन्स नव्हत्या. माझी निवड कशी झाली याची मला कल्पना नाही! मला वाटते कास्टिंग डायरेक्टरने माझे फोटो दाखवले असावेत. रितेशने मला चित्रपटाबद्दल आणि कथेबद्दल सांगितले. अशारितीने मला वेड चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.

भविष्यात जिया शंकर हिला बॉलिवूडमधील करण जोहर, इम्तियाज अली आणि झोया अख्तर यांच्यासोबत काम करायचे आहे.

टॅग्स :रितेश देशमुखजेनेलिया डिसूजा