Ankush Chaudhari Pooja Sawant Special Interview : मकरंद देशपांडे, अंकुश चौधरी आणि पूजा सावंत यांचा बहुप्रतिक्षीत ‘दगडी चाळ 2’ (Daagdi Chaawl 2) हा सिनेमा येत्या 18 ऑगस्टला चित्रपटगृहांत दाखल होतोय. त्याआधी या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगलीये. ‘चुकीला माफी नाही,’ हा सिनेमातील डायलॉग तर भलताच फेमस झाला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अंकुश व पूजाने ‘लोकमत फिल्मी’ला खास मुलाखत दिली. ही मुलाखत धम्माल रंगली. पूजाच्या कोणत्या चुकीला माफी नाही...? या प्रश्नाचं उत्तर अंकुशने दिलं. काय उत्तर दिलं, तर पुढे वाचा...
पूजाच्या ‘या’ चुकीला माफी नाही...चुकीला माफी नाही..., असा एक डायलॉग या सिनेमात आहे. या डायलॉगच्या निमित्ताने अंकुश व पूजा दोघांनाही एक कॉमन प्रश्न केला गेला. पूजाच्या कोणत्या चुकीला माफी नाही, असा प्रश्न अंकुशला केला गेला आणि यावर अंकुशने भन्नाट उत्तर दिलं.तो म्हणाला, पूजाचं प्राण्यावरच जे प्रेम आहे, तिच्या आयुष्यात मी नेहमी बघत आलोय की, तिच्याकडे ते पक्षी वा प्राणी येतात. कुणाच्या पंखाला लागलेलं असतं, कुण्या एखाद्या प्राण्याला मार लागलेला असतो. ती अशा प्राण्यांना रेस्क्यू करून त्यांचा मायेनं सांभाळ करते. हे असे जखमी, मार लागलेले प्राणी नेमके तिलाच दिसतात. अगदी खारूताईपासून, कुत्र्या-मांजरीपासून, घुबड, साप सगळेच तिच्यापर्यंत येऊन पोहोचतात. कदाचित देव त्या प्राण्यांना सांगत असतो की, पृथ्वीतलावावर एक परी आहे, तिच्याकडे जा...सगळं व्यवस्थित होईल. ती सगळ्या प्राण्यांची मदत करते, त्यांना त्यांच्या त्यांच्या पद्धतीने वागवते. मला असं वाटतं की, चुकीला माफी नाही ती या गोष्टीसाठी की... तिचं हे आयुष्य असंच राहू दे. देवाने तिला तशी देणगी दिली आहे. ती तशी वागली नाही तर तिच्या चुकीला माफी नाही...
तर अंकुश सरांच्या चुकीला माफी नाही...अंकुशच्या कोणत्या चुकीला माफी नाही, असा प्रश्न पूजाला केल्यावर ती म्हणााली, अंकुश सरांनी माझी खूप काळजी घेतली. दगडी चाळ आणि दगडी चाळ 2 या दोन्हींवेळी. कारण मला भूक लागली असेल तर मला फार राग येतो. त्यांना कळायचं, की ही चिडचीड का करतेय तर तिला भूक लागली असेल. मग माझ्या आवडीचे पदार्थ माझ्यासमोर असायचे. हे तर तुम्ही पुढे असं चालू ठेवलं नाही तर तुमच्या चुकीला माफी नाही, असं पूजा म्हणाली. त्यावर आई शाब्बास..., अशी दाद अंकुशने दिली.
आम्ही सगळं देण्याचा प्रयत्न केला आहे...पहिला भाग आला तेव्हा कसं वाटेल, किती आवडेल, हे माहित नव्हतं. पण तो आवडला लोकांना. आता दुसरा भाग येतोय म्हटल्यावर पुन्हा तेच वाटतंय. दुसºया भागात सगळं देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. जे पहिल्या भागात होतं, त्यापेक्षा आणखी वेगळं, नवं प्रेक्षकांना देण्याचा प्रयत्न आहे आणि आता दिवस जवळ येतोय. आता फक्त प्रेक्षकांनी गर्दी करायची आहे. चित्रपट बघायचा आहे आणि आम्हाला पसंती द्यायची आहे, एवढंच बाकी राहिलं आहे, असं अंकुश म्हणाला.
दुसरा पार्ट फक्त प्रेक्षकांसाठीच...‘दगडी चाळ 2’ येतोय तो फक्त प्रेक्षकांमुळे आणि प्रेक्षकांसाठीच. पहिल्या भागाला लोकांनी इतकं भरभरून प्रेम दिलं की आम्ही दुसरा पार्ट बनवला, असं पूजा म्हणाली.