Join us

स्पृहा जोशीचा पती वरद लघाटेने पत्रकार म्हणून केली होती कारकिर्दीची सुरुवात, दिसतो हँडसम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 19:07 IST

स्पृहाच्या पतीचे नाव वरद लघाटे असून स्पृहा आणि वरद यांनी सहा वर्षे रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला.

ठळक मुद्देस्पृहाने आज एक अभिनेत्री, गीतकार म्हणून स्वतःचे नाव कमावले आहे. तिने दे धमाल या मालिकेपासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली.

मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी आणि प्रतिभावंत अभिनेत्री म्हणून स्पृहा जोशीची ओळख आहे. आपल्या अभिनयाने स्पृहाने रसिकांची मनं जिंकली आहेत. विविध चित्रपटातील भूमिकांमधून स्पृहाने आपल्या अभिनयाची छाप पाडली. सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाचे ती सध्या सूत्रसंचालन करत असून तिचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.

स्पृहाच्या पतीचे नाव वरद लघाटे असून स्पृहा आणि वरद यांनी सहा वर्षे रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला. २००८ पासून हे दोघे नात्यात होते आणि अखेर २८ नोव्हेंबर, २०१४ रोजी हे दोघे विवाहबंधनात अडकले. वरदचा मराठी चित्रपटसृष्टीशी काहीही संबंध नाही. वरदने त्याची कारकीर्द एक पत्रकार म्हणून सुरू केली. तो मराठीतीत एका नामांकित वर्तमानपत्रामध्ये लेख लिहित होता. पण आता पत्रकारितेचे क्षेत्र सोडून वरद मार्केटिंग प्रोफेशनकडे वळला आहे.

स्पृहाने आज एक अभिनेत्री, गीतकार म्हणून स्वतःचे नाव कमावले आहे. तिने दे धमाल या मालिकेपासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर अग्निहोत्र, एका लग्नाची दुसरी गोष्ट, एका लग्नाची तिसरी गोष्ट, उंच माझा झोका यांसारख्या मालिकांमध्ये ती झळकली. या सगळ्याच मालिकांमधील तिच्या भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या. या मालिकेतील तिच्या भूमिकांची नाव देखील आजही लोकांच्या चांगलीच लक्षात आहेत. तसेच समुद्र, डोण्ट वरी बी हॅपी यांसारख्या नाटकातून तिने तिची अभिनयक्षमता दाखवून दिली. पैसा पैसा, मोरया, जाऊ द्या ना बाळासाहेब, बायोस्कोप, अ पेइंग गेस्ट यांसारख्या चित्रपटातील तिच्या भूमिका गाजल्या.

टॅग्स :स्पृहा जोशी