रिलीज डेट डायरी सुरू कर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 1:07 AM
आज खर्या अर्थाने मराठी चित्रपट मुंबई, पुणे, ठाणे, कोल्हापूर अशी मुख्य शहरे सोडली तर इतरत्र पोहोचलेला नाहीये, हे सत्य ...
आज खर्या अर्थाने मराठी चित्रपट मुंबई, पुणे, ठाणे, कोल्हापूर अशी मुख्य शहरे सोडली तर इतरत्र पोहोचलेला नाहीये, हे सत्य आहे. तो पोहोचण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. विदर्भ, कोकण या ठिकाणीही प्रेक्षकवर्ग आहे, पण चित्रपट त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाहीयेत.मराठी इंडस्ट्रीत सुरुवातीपासूनच वेगवेगळे प्रयोग करण्यावर भर दिला जात आहे. मात्र हे निश्चित मान्य केलं पाहिजे, की आता हे प्रयोग मोठय़ा प्रमाणावर होत आहेत आणि प्रेक्षकांकडून ते नोटीसही होत आहेत. वेगळ्या पद्धतीच्या मांडणीवर भर पूर्वीपासूनच होत आहे. पण आता मराठी चित्रपट सर्वदूर पोहोचत आहे आणि त्याकडे लक्ष दिले जात आहे. त्यामुळे मराठी चित्रपट प्रगल्भ झाला आहे, असं म्हणायला पाहिजे. याशिवाय चित्रपटांबरोबरीनेच कलाकारही लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आज अनेक प्लॅटफॉर्म तयार झाले आहेत. शब्दांकन - मृण्मयी मराठे तिने शिक्षण घेतले पत्रकारितेचे, लहानपणापासून आवड नृत्याची, पण अभिनयक्षेत्रात यायचे म्हटल्यावर घरात कायम हिंदी बोलणार्या या मुलीने मराठीलाही आपलेसे केले आणि सर्व तयारीनिशी या क्षेत्रात उतरली. सुरूवातीला शॉर्ट फिल्म्समध्ये काम करता करता ती हळूहळू चित्रपटांतही दिसू लागली. अभिनयाला सुरुवात केल्यानंतर ती गौरी, गाढवाचं लग्नं, बकुळा नामदेव घोटाळे, आबा जिंदाबाद, हाय काय नाय काय, या चित्रपटांत दिसली खरी पण तिच्या अभिनयाबरोबरच नृत्याचीही प्रेक्षकांना पारख झाली ती नटरंग चित्रपटातून.. आणि या चित्रपटानंतर ती चक्क 'अप्सरा' या नावानेच ओळखली जाऊ लागली. आता अप्सरा म्हटल्यावर तर तुम्हालाही तिचे नाव सोनाली कुलकर्णी हे उमगले असेलच. तर या अप्सरेला खरा ब्रेक मिळाला ते नटरंगमधूनच. त्यानंतर तिची 'क्षणभर विश्रांती' घेत अजिंठा, झपाटलेला 2, रमा माधव, मितवा, क्लासमेट्स, टाईमपास 2 मध्ये गेस्ट अपिअरन्स, शटर अशी यशस्वी घोडदौड सुरू आहे. या प्रवासात ती आपल्याला ग्रँड मस्ती आणि सिंघम रिटर्न्स या हिंदी चित्रपटातही पहायला मिळाली. नटरंगनंतर अजिंठा, रमा माधव, क्लासमेटस आणि शटर या चित्रपटातून एक वेगळ्याच प्रकारची सोनाली प्रेक्षकांना अनुभवायला मिळाली. नृत्यांगना असली तरी अभिनेत्री म्हणूनही तिने तिची वेगळी ओळख निर्माण केली आहे.