Join us

रेडू मधील 'देवाक् काळजी रे' गाण्याला राज्यस्तरीय पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2018 4:18 AM

कोणत्याही कला क्षेत्रातील आवड आणि त्यामधील सातत्य त्या कलाकाराला महान बनवत असते. ५५ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवात ...

कोणत्याही कला क्षेत्रातील आवड आणि त्यामधील सातत्य त्या कलाकाराला महान बनवत असते. ५५ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवात “रेडू” या चित्रपटासाठी विजय नारायण गवंडे यांना उत्कृष्ट संगीताचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. “देवाक् काळजी रे...” हे रेडू या चित्रपटातील गाणं सध्या खुप लोकप्रिय होत आहे. गुरु ठाकूर यांच्या गीताला अजय गोगावले यांनी स्वर दिले तर  विजय नारायण गवंडे यांच्या संगीतामुळे हे गाणे थेड काळजाला भिडते. “जोगवा”, पांगिरा, “माचीवरला बुधा”, “जिंदगी विराट” अशा अनेक चित्रपटांना पार्श्वसंगीत केलेल्या विजय यांच्या संगीताचा प्रवास...संगीतकार विजय नारायण गवंडे यांचा प्रवास नव्याने संगीत क्षेत्रात येणा-यांना खुप प्रेरणादायी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील वालावल हे विजय यांचे गाव. लहानपनापासूनच विजय आपल्या बाबांच्या भजनी मंडळाला साथसंगत करायचे. गणेशोत्सव असो की अन्य कोणताही उत्सव विजय आणि त्याचे मित्रमंडळी त्या कार्यक्रमात हिरहिरीने भाग घ्यायचे. कोणतही संगीताचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण न घेता विजय हे कोणतेही वाद्य अगदी लीलया वाजवायचे. वाडीतील लोकांना त्यांचं संगीत खुप आवडायचं. शाळेत असताना अनेक कवितांना वेगळ्या चाली लावून त्या मित्र-मैत्रिणींना ऐकवायचे शिवाय त्यांना संगित देखील द्यायचे. यामुळे विजय आणि त्यांचे मित्र खुप धम्माल करत असत. पुढे कॉलेजमध्ये गेल्यावर त्यांनी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमावेळी गाणी आणि वाद्याने अनेक नवीन मित्रमंडळी जोडले. विजय यांना मित्राने एका ऑर्केस्ट्राचे तिकीट दिले. त्यावेळी तो ऑर्केस्ट्रातील सिंथेसायजर आणि इतर आधुनिक वाद्य पाहुन विजय आश्चर्यचकीत झाले. हि नवीन वाद्य शिकायची आणि त्यावर आपलं प्रभुत्व सिद्ध करण्याचा ध्यास विजय यांनी घेतला. १९९४ सालच्या दरम्यान वडीलांकडून पैसे घेऊन एक नविन सिंथेसाजर विकत घेतला आणि तिथून संगितातील आधुनिकतेचा प्रवास सुरु झाला. सुरुवातीच्या काळात पुण्यात एका ऑर्केस्ट्राला साथ देवू लागलो.एके दिवशी याच ऑर्केस्ट्रातील प्रमुख संगीतकार आजारी पडले. त्यावेळी घाबरत घाबरत विजय यांनी संपुर्ण कार्यक्रम उत्तम पार पाडला. पुढे “चौफुला” आणि इतर मोठे सांस्कृतिक कार्यक्रम केले. उषा मंगेशकर, आशा भोसले अशा दिग्गज लोकांना साथसंगत द्यायला सुरुवात झाली.२००४ साली मुंबई गाठली. एका ओळखीच्या गायकाने पार्श्वसंगीतासाठी काम दिले. मुंबईत ज्याठिकाणी रहायचो तेथे शेजारी एक बंगाली व्यक्ती रहायची. रोजचा सराव आणि रियाज पाहून त्याने त्याचा गाण्याचा अल्बम करण्याची विनंती केली. मिलिंद शांताराम नांदगावकरांच्या स्टुडियोत ते गाणे रेकॉर्ड झाले. यातूनच पुढे अनेक चित्रपटांना पार्श्वसंगीत आणि संगीत दिले. मराठीतील पार्श्वसंगीतासाठी पहिल्यांदा पुरस्कार जाहिर झाला. “जोगवा” या चित्रपटाला पार्श्वसंगीतासाठी सांस्कृतिक कला दर्पनचा पहिला पुरस्कार मिळाला. गेल्यावर्षीच्या ५४ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवात विजय यांना “माचीवरला बुधा” या चित्रपटासाठी उत्कृष्ट पार्श्वसंगीताचा पुरस्कार मिळाला होता. विजय यांनी संगीत दिलेले “रेडू”, “आटपाडी नाईट्स”, असे अनेक आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत.